News Flash

IPL 2018 – … म्हणून रशीद खानला कमी पडल्या फक्त तीन विकेट

अफगाणिस्तानचा रशीद खान याने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले. मात्र आयपीएलची 'पर्पल कॅप' मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

आयपीएलचा हंगाम नुकताच संपला. या हंगामात अनेक विक्रम प्रस्थापित झाले आणि अनेक नवे खेळाडू उदयास आले. काही परदेशी खेळाडूंनीही यंदाच्या आयपीएलवर आपली छाप सोडली. अफगाणिस्तानचा रशीद खान याने या हंगामात सर्वांचे लक्ष वेधले. आपली फिरकी गोलंदाजी आणि विशेष म्हणजे गुगलीच्या जोरावर त्याने अनेक अनुभवी फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. मात्र सर्वाधिक बळी टिपून आयपीएलची ‘पर्पल कॅप’ मिळवण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

पंजाबचा वेगवान गोलंदाज अँड्रू टाय हा यंदाच्या आयपीएलमध्ये ‘पर्पल कॅप’चा मानकरी ठरला. त्याने केवळ १४ सामन्यात २४ बळी टिपले. पण रशीदला आयपीएलमध्ये एकूण १७ सामन्यात २१ बळी टिपता आले. साखळी फेरीपर्यंत रशीदने १४ सामन्यात १६ बळी टिपले होते. पण त्यानंतर ‘प्ले ऑफ’च्या पहिल्या दोन सामन्यात रशीदने दमदार कामगिरी केली. त्याने चेन्नईविरुद्धच्या ‘क्वालिफायर १’मध्ये २ बळी टिपले तर कोलकाताविरुद्धच्या ‘क्वालिफायर २’मध्ये ३ गडी बाद केले. त्यामुळे अचानक त्याचे १६ सामन्यात २१ बळी झाले.

अंतिम सामन्यात रशीदला ४ बळी मिळवून टायच्या पुढे जाण्याची संधी होती. मात्र शेवटचा सामना रशीदसाठी फलदायी ठरला नाही. शेन वॉटसनने त्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे रशीदला आपली नेहमीची गोलंदाजी करता आली नाही. वॉटसच्या धुलाईमुळे चेन्नईला विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा कमी होत गेल्या. आणि त्याचा परिणाम रशीदच्या गोलंदाजीवर झाला. रशीदने कमीत कमी धावा देण्याच्या उद्देशाने गोलंदाजी केली त्यामुळे त्याला त्या सामन्यात एकही गडी बाद करता आला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2018 12:11 pm

Web Title: rashid short of 3 wickets for purple cap
टॅग : Ipl,Rashid Khan
Next Stories
1 सचिन तेंडुलकरचं एक ट्विट आणि रशीद खान झाला सुपरहिट
2 IPL 2018 – वानखेडेवर नव्हे; तर ‘येथे’ पाहिला सचिनने अंतिम सामना
3 IPL 2018 : विजेत्या चेन्नईच्या संघाला बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम माहितीये?
Just Now!
X