News Flash

IPL 2020 : फिरकीच्या जाळ्यात पुन्हा अडकला वॉटसन

अक्षर पटेलने घेतला चेन्नईचा महत्वपूर्ण बळी

दिल्ली कॅपिटल्सला १७५ धावांवर रोखण्यात यशस्वी झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाची सुरुवात मात्र खराब झाली. मुरली विजय आणि शेन वॉटसन या जोडीने चेन्नईच्या डावाची सावध सुरुवात केली. दिल्लीच्या गोलंदाजांचा सावधतेने सामना करताना शेन वॉटसनने चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना आयपीएलमध्ये १ हजार धावांचा टप्पाही ओलांडला. मात्र पुन्हा एकदा वॉटसनची दुखरी नस या सामन्यात पुढे आली.

फिरकीपटूंना खेळताना वॉटसन बऱ्याचदा अडखळतो हे दिसून आलं आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यातही वॉटसन अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. वॉटसनने फक्त १४ धावा केल्या. वॉटसनला बाद करण्याची अक्षर पटेलची ही सहावी वेळ ठरली आहे.

आयपीएलमध्ये शेन वॉटसनला सर्वाधिकवेळा बाद करणारे फिरकीपटू –

  • अमित मिश्रा – ६ वेळा
  • अक्षर पटेल – ६ वेळा
  • रविंद्र जाडेजा – ५ वेळा
  • सुनिल नरिन – ४ वेळा

वॉटसन माघारी परतल्यानंतर त्याचा साथीदार मुरली विजयही तात्काळ माघारी परतला. अवघ्या १० धावांवर तो नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर रबाडाच्या हाती झेल देऊन माघारी परतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 10:21 pm

Web Title: ipl 2020 axar patel fools shane watson again in ipl takes his wicket 6th time psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : दोन बळी घेत चावलाचा विक्रम, दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत स्थान
2 VIDEO: ‘सुपरमॅन’ धोनी! हवेतच घेतला दिल्लीच्या कर्णधाराचा झेल
3 VIDEO: धोनीचं ‘स्मार्ट स्टंपिंग’! पृथ्वी शॉला काही कळण्याआधीच बेल्स हवेत
Just Now!
X