IPL MI vs SRH Live Updates: IPL 2020च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभूत केले आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये दिमाखात प्रवेश केला. कायरन पोलार्डने ४१ धावा करत मुंबईला १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

‘प्ले-ऑफ्स’मध्ये गुरूवारी मुंबई विरूद्ध दिल्ली तर शुक्रवारी हैदराबाद विरूद्ध बंगळुरू असे सामने रंगणार आहेत. पहिल्या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत जाईल. तर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील विजेत्याशी खेळेल. त्यातून अंतिम फेरीतील दुसरा संघ निवडला जाईल.

असा रंगला सामना…

नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघाने मुंबईला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केलं. दुखापतीनंतर संघात परतलेला कर्णधार रोहित शर्मा ४ धावांवर तर क्विंटन डी कॉक २५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव (३६) आणि इशान किशन (३३) यांनी चांगली खेळी केली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात ते अपयशी ठरले. कृणाल पांड्या (०) आणि सौरभ तिवारीही (१) झटपट माघारी परतले. अखेर शेवटच्या टप्प्यात कायरन पोलार्डने २ चौकार आणि ४ षटकार खेचत ४१ धावा केल्या आणि संघाला १४९ पर्यंत मजल मारून दिली. हैदराबादकडून संदीपने ३, होल्डर-नदीमने २-२ आणि राशिदने १ बळी टिपला.

पोलार्डची धडाकेबाज खेळी…

१५० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांची आक्रमक सुरूवात केली. डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर-प्लेच्या षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत त्यांनी ६ षटकात ५६ धावा केल्या. डावाच्या १२व्या षटकात फिरकीपटू राहुल चहरच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरने षटकार लगावत आपलं अर्धशतक साकारलं. तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर साहाने एकेरी धाव अर्धशतक केलं. त्यानंतर वॉर्नरने धावगती वाढवत धमाकेदार नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याने १० चौकार आणि १ षटकार लगावला. वृद्धिमान साहानेही ७ चौकार आणि १ षटकार लगावत नाबाद ५८ धावा केल्या आणि त्याला चांगली साथ दिली.

Live Blog

22:58 (IST)03 Nov 2020
हैदराबादचा Playoffs मध्ये दिमाखदार प्रवेश; मुंबईला १० गडी राखून केलं पराभूत

IPL 2020च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभूत केले आणि 'प्ले-ऑफ्स'मध्ये दिमाखात प्रवेश केला. कायरन पोलार्डने ४१ धावा करत मुंबईला १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामन्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. 'प्ले-ऑफ्स'मध्ये गुरूवारी मुंबई विरूद्ध दिल्ली तर शुक्रवारी हैदराबाद विरूद्ध बंगळुरू असा सामना रंगणार आहे.

22:27 (IST)03 Nov 2020
वॉर्नर, साहाची एकाच षटकात दमदार अर्धशतके

डावाच्या १२व्या षटकात फिरकीपटू राहुल चहरच्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरने षटकार लगावत आपलं अर्धशतक साकारलं. तर त्याच षटकात चौथ्या चेंडूवर साहाने एकेरी धाव अर्धशतक केलं.

22:19 (IST)03 Nov 2020
डेव्हिड वॉर्नरचा नवा विक्रम

IPLकारकिर्दीत लगावले ५०० चौकार

22:16 (IST)03 Nov 2020
खेळ भावनेचा आदर करण्यातही मुंबईच पुढे...
22:06 (IST)03 Nov 2020
हैदराबादचा 'पॉवर-प्ले'; मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई

डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी पॉवर-प्लेच्या षटकांत अर्धशतकी भागीदारी केली. मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत त्यांनी ६ षटकात ५६ धावा केल्या.

21:54 (IST)03 Nov 2020
हैदराबादच्या सलामीवीरांची आक्रमक सुरूवात

१५० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीवीरांची आक्रमक सुरूवात केली.

21:05 (IST)03 Nov 2020
'पोलार्ड पॉवर'ची कमाल

मुंबई इंडियन्सच्या संघाने २० षटकांत १४९ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या टप्प्यात धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्डने केलेल्या ४१ धावांच्या खेळीमुळे मुंबईला ही धावसंख्या गाठता आली.

20:56 (IST)03 Nov 2020
इशान किशन त्रिफळाचीत; संदीपचा तिसरा बळी

एक बाजू लावून धरत चांगली खेळी करणारा इशान किशन चुकीचा फटका खेळताना ३३ धावांवर त्रिफळाचीत झाला. संदीप शर्माने त्याला माघारी धाडत आजच्या सामन्यातील तिसरा बळी टिपला. 

20:33 (IST)03 Nov 2020
सौरभ तिवारी बाद; शंभरीच्या आतच निम्मा संघ तंबूत

पाठोपाठ सौरभ तिवारी राशिद खानच्या गोलंदाजीवर एका धावेवर बाद झाला. त्यामुळे शंभरीच्या आतच निम्मा संघ तंबूत परतला.

20:29 (IST)03 Nov 2020
सूर्यकुमार, कृणाल पांड्या एकाच षटकात माघारी

खेळपट्टीवर स्थिरावलेला सूर्यकुमार यादव २९ चेंडूत ३६ धावा काढून नदीमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच षटकात कृणाल पांड्याही शून्यावर माघारी परतला.

19:55 (IST)03 Nov 2020
क्विंटन डी कॉक त्रिफळाचीत; मुंबईला दुसरा धक्का

संदीप शर्माच्या षटकात पहिल्या ३ चेंडूंवर १६ धावा ठोकल्यावर क्विंटन डी कॉक त्रिफळाचीत झाला. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २५ धावा केल्या.

19:42 (IST)03 Nov 2020
रोहित शर्मा स्वस्तात माघारी; मुंबईला पहिला धक्का

दुखापतीनंतर संघात परतलेला कर्णधार रोहित शर्मा केवळ ४ धावा काढून झेलबाद झाला.

19:23 (IST)03 Nov 2020
हैदराबादच्या संघात एकमेव बदल

करो वा मरोच्या लढतीसाठी हैदराबादच्या संघाने अभिषेक गुप्ताच्या जागी प्रियम गर्गला संघात घेतलं आहे.

19:17 (IST)03 Nov 2020
मुंबईच्या 'हिटमॅन'चं पुनरागमन...

मुंबईच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीनंतर पुन्हा मैदानात उतरला आहे. जयंत यादवच्या जागी तो संघात खेळणार आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट जोडीला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी जेम्स पॅटिन्सन आणि धवल कुलकर्णीला संघात स्थान मिळालं आहे.


19:07 (IST)03 Nov 2020
नाणेफेक जिंकून हैदराबादची प्रथम गोलंदाजी

हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.