News Flash

IPL 2020 : विजेत्यासह तीन संघ होणार मालामाल; RCB ला मिळणार इतके कोटी

गतवर्षीपेक्षा बक्षिसाची रक्कम अर्धी करण्यात आली आहे...

IPL 2020 Prize Money : संयुक्त अरब अमीरात म्हणजेच UAE मध्ये सुरु असलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामातील फक्त दोन सामने बाकी आहेत. तुम्हाला माहितेय का, आयपीएल विजेत्या आणि इतर तीन संघाना यंदा बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार आहे? जर तुम्हाला माहित नसेल तर आपण प्ले ऑफमध्ये पोहचणाऱ्या संघासोबतच आयपीएल चषकावर नाव कोरणाऱ्या संघाला मिळणाऱ्या बक्षीसाबद्दल जाणून घेऊयात…

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बक्षिसाची रक्कम अर्धी करण्यात आली आहे. विजेत्यांना यंदा २० कोटींऐवजी १० कोटी आणि चषक मिळणार असून…उप-विजेत्यांना यंदा १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयने मार्च महिन्यातच याबाबतची माहिती संघमालकांना दिली आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघाला यंदाच्या हंगामात ४.३ कोटी रुपये मिळणार आहेत.

आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेतील विजेत्यांना मिळणारी ही रक्कम कमी वाटतेय कारण, लिलावप्रक्रियेत खेळाडूंनाच १५ ते १७ कोटी रुपयांना विकत घेतलं जात किंवा रिटेन केलं जातं. पण बोर्ड आणि फ्रेंचायजी यांची कमा बक्षीसाची रक्कम नव्हे तर स्पॉन्सर आहेत.

दरम्यान, मुंबईच्या संघानं आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर आरसीबीचा संघ एलिमेनटरमधून बाहेर पडला आहे. या स्पर्धेअखेर विराट कोहलीचा बेंगळुरु संघ चौथ्या स्थानावर फेकला जाणार आहे. हैदराबाद आणि दिल्ली यांच्यात उद्या दुसरा क्वालिफाय सामना होणार आहे. यामधील विजेता संघ अंतिम फेरीत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघासोबत भिडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 10:55 am

Web Title: ipl 2020 prize money ipl 13 winner will get 10 crore rupees runner up will get more than 6 crore nck 90
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : … तर RCB च्या कर्णधारपदावरून विराटला हटवलं असतं; गंभीरचा निशाणा
2 IPL 2020: …म्हणून आम्ही हरलो!; स्पर्धेबाहेर जाणाऱ्या विराटची कबुली
3 IPL 2020: OUT की NOT OUT? Video पाहून तुम्हीच ठरवा
Just Now!
X