07 March 2021

News Flash

IPL 2020: विकृतीचा कळस; पराभवानंतर धोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी

चेन्नईच्या संघाचा कोलकाताकडून १० धावांनी पराभव

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जला १० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. एका क्षणाला सामन्यात वरचढ असणारा चेन्नईचा संघ काही क्षणांत बॅकफूटवर फेकला गेला. त्यातच केदार जाधवने मोक्याच्या क्षणी वाया घालवलेले चेंडू आणि संथ फलंदाजी याचा चेन्नईला मोठा फटका बसला. सोशल मीडियावर अनेकांनी केदार जाधवला संघातून वगळण्याची मागणी केली. अनेकांनी जाडेजा-ब्राव्हो या कसलेल्या फलंदाजांआधी जाधवला फलंदाजीसाठी आधी कसं पाठवलं याबद्दलही प्रश्न उपस्थित केले. याच सोशल मीडियावर काहींनी चक्क विकृतीचा कळस गाठला.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सामन्यात फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यानंतर काही विकृत मनोवृत्तीच्या नेटकऱ्यांनी चक्क धोनीच्या मुलीला सोशल मीडियाच्या पोस्टवरील कमेंट्सच्या माध्यमातून बलात्काराची धमकी दिली. धोनीची मुलगी ५ वर्षांची असून ती सध्या भारतातच आहे. तर धोनी युएईमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व करतो आहे. IPL 2020 मध्ये अद्याप धोनीला आपली चमक दाखवता आलेली नाही. एका सामन्यात धोनीने ४७ धावा केल्या पण त्या सामन्यात त्याला मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करता आली नाही. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केली जात आहे. परंतु याच बाबतीत काहींनी विकृतीचा कळस गाठत धोनीची चिमुरडी झिवा हिच्यावर बलात्काराची धमकी दिली.

राहुल त्रिपाठीच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाताने चेन्नईला १६८ धावांचं आव्हान दिलं होतं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली होती. फाफ डु प्लेसिस आणि शेन वॉटसनने सुरुवातीच्या षटकांमध्ये काही चांगले फटके खेळले. डु प्लेसिस लवकर बाद झाला पण अंबाती रायुडूने शेन वॉटसनला चांगली साथ दिली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असं वाटत असतानाच रायुडू आणि वॉटसन बाद झाले. पाठोपाठ धोनीदेखील माघारी परतला. तशातच जाडेजासारखा अनुभवी खेळाडू समोर असतानाही केदार जाधवने शेवटच्या षटकात दोन चेंडू निर्धाव घालवले, त्यामुळे रविंद्र जाडेजाने केलेल्या फटकेबाजीचा उपयोग होऊ शकला नाही आणि चेन्नईला पराभूत व्हावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2020 10:12 pm

Web Title: ms dhoni little daughter ziva is getting rape threats after csk lost ipl 2020 match to kkr vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: दिल्लीकरांचा विजयी ‘पंच’! राजस्थानचा केला दणदणीत पराभव
2 “मॅक्सवेलच्या मागे कशाला धावत सुटता?”; पंजाबच्या माजी प्रशिक्षकाचा सवाल
3 “CSKचे काही फलंदाज सरकारी नोकरीसारखे खेळतात”; सेहवागची फटकेबाजी
Just Now!
X