01 March 2021

News Flash

IPL 2020 Video: धोनी गुरूजींनी घेतली राहुलची शिकवणी

चेन्नईचा पंजाबवर १० गडी राखून विजय

IPL 2020 CSK vs KXIP: सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाची गाडी अखेर रविवारी रूळावर आली. पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडत या दोघांनी चेन्नईसाठी IPLमधील सर्वोत्तम सलामी दिली आणि १० गडी राखत संघाला विजय मिळवून दिला.

पंजाबच्या संघाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत मात्र त्यांना एकही गडी बाद करता आला नाही. गोलंदाजीत अनेक बदल करूनही वॉटसन-डु प्लेसिस जोडी अभेद्यच राहिली. सामना संपल्यानंतर भारताच्या यशस्वी माजी कर्णधारांपैकी एक महेंद्रसिंग धोनी हा पंजाबचा कर्णधार राहुल याला काही टिप्स देताना दिसला. त्याच्याशिवाय मयंक अग्रवालदेखील धोनीशी चर्चा करताना दिसला. मैदानावर एकमेकांचे वैरी असलेले दोन खेळाडू सामना संपल्यानंतर मात्र खेळभावनेचा उत्तम नमुना पेश करताना दिसले.

दरम्यान, १७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. वॉटसनने आपलं विसावं अर्धशतक पूर्ण केलं. तर डु प्लेसिसने १५वं अर्धशतक ठोकलं. डु प्लेसिसच्या नाबाद ८७ आणि वॉटसनच्या नाबाद ८३ धावांच्या बळावर चेन्नईने ऐतिहासिक विजय मिळवला. त्याआधी, पंजाबच्या डावात कर्णधार राहुलने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2020 7:10 pm

Web Title: ms dhoni tuitions shares knowledge of cricket words of wisdom to kl rahul mayank agarwal ipl 2020 csk vs kxip vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 Video: …अन् मैदानातच झाली केदार जाधव-जाडेजामध्ये बाचाबाची
2 IPL 2020 : हैदराबादच्या अडचणींमध्ये भर, दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारची स्पर्धेतून माघार
3 IPL 2020: मुंबईकर रोहित शर्मा म्हणतो, “अशी डोकेदुखी असणं…”
Just Now!
X