News Flash

“अंबाती रायुडू-पियुष चावला ‘लो-प्रोफाईल’ खेळाडू”, संजय मांजरेकरांवर नेटकरी भडकले

सोशल मीडियावर संजय मांजरेकर पुन्हा एकदा ट्रोल

फोटो सौजन्य - BCCI

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर हे नेहमी आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी समालोचनादरम्यान भारतीय खेळाडूंवर झालेली टीका आणि हर्षा भोगले यांच्यासोबत समालोचनदरम्यान रंगलेलं द्वंद्व यामुळे मांजरेकरांना कॉमेंट्री पॅनलमध्ये आपलं स्थान गमवावं लागलं. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली बीसीसीआयने मांजरेकर यांना संधी दिली नाही.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात केली. अंबाती रायुडूने या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. तर गोलंदाजीतही फिरकीपटू पियुष चावलाने आश्वासक कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करताना मांजरेकर यांनी ट्विटर हँडलवर त्यांचा उल्लेख Low Profile Cricketers असा केला.

ज्यामुळे मांजरेकरांना पुन्हा एकदा टीकेला सामोरं जावं लागत आहे.

अंबाती रायुडूने सलामीच्या सामन्यात ४८ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ७१ धावा केल्या. त्याला फाफ डु-प्लेसिसनेही नाबाद अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2020 3:10 pm

Web Title: sanjay manjrekar upsets twitterati again calls ambati rayudu piyush chawla pretty low profile cricketers psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : मंकडींग करुन स्पर्धा जिंकता येईल पण मनात पोकळ भावना तयार होते !
2 IPL 2020: धोनीचा पराक्रम! ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
3 IPL 2020 : दुखापतग्रस्त इशांत शर्मा सलामीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता
Just Now!
X