पंजाबविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने तुफान फटकेबाजी करत २० षटकात १९१ धावा केल्या. रोहित शर्माने अत्यंत संयमी खेळी करत ७० धावांची खेळी केली. पण शेवटच्या षटकांमध्ये पांड्या आणि पोलार्ड जोडीने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पोलार्डने २० चेंडूत नाबाद ४७ धावा कुटल्या. तर हार्दिकने ११ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या आणि पंजाबला १९२ धावांचे आव्हान दिलं.

अवश्य वाचा – Video : याला म्हणतात कमबॅक ! पहिल्याच षटकात कोट्रेलकडून डी-कॉकची दांडी गुल

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पंजाबने आपल्या डावाची सावध सुरुवात केली. स्पर्धेत फॉर्मात असलेल्या लोकेश राहुल आणि मयांक अग्रवालने मुंबईच्या गोलंदाजांचा सावधपणे सामना केला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केल्यानंतर जसप्रीत बुमराहने मयांक अग्रवालला माघारी धाडत पंजाबला पहिला धक्का दिला. मयांक खेळपट्टीवर स्थिरावल्यास मुंबईच्या संघासाठी डोकेदुखी ठरु शकला असता. बुमराहने टाकलेला भन्नाट चेंडू मयांकला समजलाच नाही आणि तो क्लिन बोल्ड होऊन माघारी परतला. पाहा हा व्हिडीओ…

मयांकने १८ चेंडूत ३ चौकारांनिशी २५ धावा केल्या. यानंतर करुण नायरही निराशा करत बाद झाला. कृणाल पांड्याने त्याला माघारी धाडलं. मुंबईच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही.