मयूरेश मोघे यांनी पुण्यातून छायाचित्रणविषयक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील केंटुकी विद्यापीठातून छायाचित्रणातील प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केला. अलीकडेच मुंबईच्या जहांगीर कलादालनात त्यांचे ‘गूढ प्रकटीकरण’ हे प्रदर्शन पार पडले. छायाचित्रण म्हणजे केवळ समोर जे दिसते त्याचे चित्रण नव्हे तर त्यातून रूपाकारासह अनेक बाबींचा ललित कलेच्या अंगाने घेतलेला शोध असे मयूरेशची छायाचित्रे पाहिल्यानंतर म्हणावे लागते. प्रस्तुत छायाचित्र हे पॅटर्न पद्धतीतील भासावे असे ‘पोत’दार छायाचित्र आहे.

मयुरेश मोघे –