भार्गवकुमार कुलकर्णी या तरुण कलावंताने चितारलेले चित्र. लेणींमधील शिल्पकृती न्याहाळणारी लहान मुलगी या चित्रामध्ये लेणींमधील ते छायाप्रकाशाच्या खेळातून तयार होणारे काहीसे गूढ वातावरण नेमके आणण्यात चित्रकाराला यश आले आहे. शिवाय त्या मुलीची देहबोली, उजवा पाय थोडा उचललेला, डोळे समोरून दिसत नसले तरी एकटक पाहण्याची देहबोलीतून व्यक्त होणारी क्रिया हे सारे घटक चित्रणाचा क्षण नेमका जिवंत करतात.