News Flash

बालचित्रवाणी बालभारतीत विलीन होणार

बालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली.

बालचित्रवाणीच्या गेल्या चार वर्षे प्रलंबित प्रश्नावर आता अखेर तोडगा निघाला असून ‘जे चालत नाही ते दुकान कशाला चालू ठेवायचे?’ असे म्हणून बालचित्रवाणी ही संस्था बालभारतीत विलीन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिली.

बालचित्रवाणीचा निधी केंद्र शासनाने थांबवल्यानंतर ही संस्था अनेक समस्यांच्या घेऱ्यात अडकली. बालचित्रवाणीचे काय होणार हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण विभागात प्रलंबित आहे. त्याबाबतच्या विविध चर्चावर तावडे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी पडदा टाकला.

‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दूरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच उपयोग नाही,’ अशी टिपणी करून राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच बालचित्रवाणी आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती, तावडे यांनी दिली. बालभारतीची ई-लìनग शाखा म्हणून बालचित्रवाणी काम करणार आहे.

तावडे म्हणाले, ‘बालचित्रवाणी हे युनिट आता ई-लìनग साहित्य निर्मितीचे युनिट म्हणून जगविणे गरजेचे आहे. त्याला योग्य अधिकार दिले पाहिजेत. बालचित्रवाणीच्या सध्याच्या नियमात ते बसत नाही. त्यामुळे बालचित्रवाणी बालभारतीत विलीन करण्यात येणार आहे. सुरुवातीला बालभारतीच्या निधीवर उभा राहिल्यानंतर हा ई-लìनग विभाग स्वत:चे उत्पन्न मिळवू शकेल. काळानुरूप शिक्षण बदलले पाहिजे. कालांतराने, अजून २० वर्षांनी बालभारतीचा छपाई विभाग बंद होईल आणि ई-लìनगच चालेल. त्यामुळे आपण पुढे जाऊन विचार केला पाहिजे. एखाद्या संस्थेबाबत उगाचच भावनिक होऊन त्या संस्थेचे नुकसान करण्यापेक्षा काळानुरूप ती बदलावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मागील काही महिन्यांपासून थकलेले कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याचे आदेश देण्यात आले असून ती प्रक्रिया सुरू आहे. तेथील कर्मचारी टिकविणे, त्यांना बदलत्या काळानुसार प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे.’

‘न चालणारे दुकान बंद करा’

‘आज बालचित्रवाणीचा कार्यक्रम कुठल्याच दूरदर्शन वाहिनीवर चालत नाही. जे चालत नाही ते दुकान चालू ठेवण्यात काहीच उपयोग नाही,’ अशी टिपणी करून राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था म्हणजेच बालचित्रवाणी आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळामध्ये (बालभारती) मध्ये विलीन करण्यात येणार असल्याची माहिती, तावडे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 2:40 am

Web Title: balacitravani will merge into balabharati
Next Stories
1 जिल्हावार वैद्यकीय महाविद्यालय योजना अधांतरी!
2 ‘फ्रेशर्स पार्टी’ करणाऱ्या ‘व्हीजेटीआय’च्या दोन विद्यार्थ्यांची वसतिगृहातून गच्छंती
3 तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्णयाची शिक्षा विद्यार्थ्यांना
Just Now!
X