अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी सोमवारऐवजी मंगळवारी जाहीर झाली असून, पर्याय अर्ज भरलेल्या एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या एक लाख ३८ हजार ७४१ जागांसाठी एक लाख नऊ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. अभियांत्रिकीसाठी मार्गदर्शन केंद्रावर एक लाख १५ हजार ७१५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले, मात्र त्यापकी तीन कॅप राऊंडसाठी एक लाख नऊ हजार २३ अर्ज पात्र ठरले होते. त्यापकी एक लाख दोन हजार विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांचा पर्याय अर्ज भरला आहे. त्यामुळे पहिल्या यादीत ८१ हजार प्रवेश निश्चित झाले. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज स्वीकृती केंद्रात जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे. यानंतर होणाऱ्या तीन फेऱ्यांमध्येही विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.