वेगवेगळ्या प्रकारचे अपंगत्व असलेल्या व्यक्तींना शिक्षण – प्रशिक्षण देण्यासाठी काही वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम केंद्र सरकारने सुरू केले आहेत. यासंदर्भातील अभ्यासक्रम चालविणाऱ्या देशातील दोन महत्त्वाच्या संस्थांमधील अभ्यासक्रमांची देत आहोत. यात पदवी, पदविका प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
* अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड :
ही संस्था केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-  
अर्हता :
* बॅचलर ऑफ ऑडिऑलॉजी अ‍ॅण्ड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी : अर्हता – बारावी विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, कोलकता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. कालावधी- चार वष्रे. या अभ्यासक्रमाच्या मुंबई कॅम्पसमध्ये NEET- नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट- २०१३च्या गुणांवर आणि AY JNIHH टेस्टच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. AY JNIHH टेस्ट मुंबई आणि कोलकता येथे १५ जून २०१३ रोजी घेण्यात येईल.
* डिप्लोमा इन एज्युकेशन (स्पेशल एज्युकेशन) : अर्हताको णत्याही विषयातील बारावी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो.
* डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अँड स्पीच : अर्हता- बारावी विज्ञान, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स किंवा बायोलॉजी. हा अभ्यासक्रम संस्थेच्या भुवनेश्वर, कोलकाता, सिकंदराबाद, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालवला जातो.
* डिप्लोमा इन साइन लँग्वेज इंटरप्रिटर : अर्हताको णत्याही शाखेतील बारावी. उच्च अर्हता असल्यास उत्तम. बारावी परीक्षेत ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असल्यास दरमहा २००० रुपये विद्यावेतन दिले जाते. हा अभ्यासक्रम संस्थेच्या कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली या कॅम्पसमध्ये चालविला जातो. कालावधी एक वर्ष.
* बॅचलर ऑफ एज्युकेशन इन हिअरिंग इम्प्ल्पाटिंग : अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी, हा अभ्यासक्रम
संस्थेच्या मुंबई, कोलकाता, सिकंदराबाद या कॅम्पसमध्ये चालवला जातो. या अभ्यासक्रमाच्या मुंबई आणि कोलकाता कॅम्पस येथील प्रवेशासाठी मुंबई येथील कॅम्पसमध्ये प्रवेशपरीक्षा घेतली जाते. कालावधी- एक वष्रे. पत्ता- अली यावर जंग नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हिअिरग हँडिकॅप्ड, वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे (प.), मुंबई-४०००५०, दूरध्वनी-०२२- २६४००९९४, फॅक्स- २६४०४१७० मेल- nihhac@yahoo.com वेबसाइट- ayjnihh.nic.in अर्जाची किंमत ७५० रुपये.
* ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अ‍ॅण्ड हिअिरग :म्हैसूर येथील या संस्थेमध्ये बॅचलर ऑफ सायन्स इन स्पीच अँड हिअिरग हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. कालावधी- चार वर्षे. हा अभ्यासक्रम सहा सत्रांचा आहे. एक वर्ष इन्टर्नशीप करावी लागते. एकूण ६२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अर्हता- बारावी विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रवेश परीक्षा ८ जून २०१३ रोजी घेण्यात येईल.
* इतर अभ्यासक्रम :
* सर्टिफिकेट कोर्स ऑन कम्युनिकेशन डिसऑर्डर : अर्हता- दहावी उत्तीर्ण. कालावधी- १४ आठवडे. २० ते २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* डिप्लोमा इन हिअिरग एड अ‍ॅण्ड इअरमोल्ड टेक्नॉलॉजी : अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स विषयासह आयटीआय. कालावधी- एक वर्ष. २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* डिप्लोमा इन हिअिरग लँग्वेज अ‍ॅण्ड स्पीच थ्रू क्वासी स्टन्स मोड : अर्हता- बारावी, कालावधी- एक वर्ष. २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* डिप्लोमा इन डेफ अ‍ॅण्ड हिअिरग : अर्हता- बारावी (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ गणित)/ कालावधी- एक वर्ष. २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
* बॅचलर ऑफ सायन्स इन एज्युकेशन इन हिअिरग
इम्पेरमेन्ट : या अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो. प्रवेशक्षमता- २० विद्यार्थी. अर्हता- बीएड्. या  अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष.
पत्ता – ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ स्पीच अँड हिअिरग, नमिशाम कॅम्पस, मानसगंगोत्री, म्हैसूर- ५७०००६, दूरध्वनी०८२१ – २५१४४४९, वेबसाइट- http://www.aiishmysore.in ईमेल- admissions@aiishmysore.in
*  सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज अँड इंजिनीअिरग : सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अँड इंजिनीअिरग ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या वतीने बॅचलर ऑफ फिशरिज सायन्स (नॉटिकल सायन्स) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. हा अभ्यासक्रम आठ सत्रांमध्ये शिकवला जातो. हा इंटिग्रेटेड स्वरुपाचा अभ्यासक्रम आहे.
यात मासेमारी नौकांबाबत प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमाला डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांला बारावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या इतर विषयांमध्ये सरासरीने ५० टक्के गुण मिळायला हवे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अट लागू नाही. विद्यार्थ्यांचे वय १ ऑक्टोबर २०१३ रोजी किमान १७ आणि कमाल २० वष्रे असावे. या अभ्यासक्रमाला २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
*  प्रवेशपरीक्षा :
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ८ जून २०१३ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा कोची, चेन्नई आणि विशाखापट्टणम येथे होईल. मुलाखती १६ जुल २०१३ रोजी होतील. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादी तयार करताना बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांचासुद्धा विचार करण्यात येतो. २३ जुल २०१३ पासून अभ्यासक्रमास प्रारंभ होईल.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्त असावा. प्रत्येक सत्रात समुद्रात जाणाऱ्या नौकेवर प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. पत्ता : सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरिज नॉटिकल अँड  इंजिनीअिरग ट्रेनिंग, फाइन आर्ट अव्हेन्यू, कोची- ६८२०१६, दूरध्वनी- ९४८४-२३५१६१० फॅक्स- २३७०८७९, मेल cifnet@ nic.in http://www.cifnet.gov.in