राज्यातील पॉलिटेक्निकल अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू होत आहेत. प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी हे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने चार फेऱ्यांत होणार आहेत. राज्यातील ३९६ अर्ज स्वीकृती केंद्रांत (एफसी) प्रवेश अर्जाची विक्री होणार आहे. राज्यातील सर्व तंत्रनिकेतन कॉलेजे या प्रवेशप्रक्रियेसाठी सुविधा केंद्र म्हणून काम करणार आहेत. खुल्या वर्गासाठी ४०० तर मागासवर्गीयांसाठी ३०० रुपये प्रवेश अर्जाची किंमत आहे. अर्जासोबत मिळालेल्या लॉग इन किटच्या आधारे अर्ज सादर करावयाचे आहेत.  ही प्रक्रिया www.dtemaharashtra.gov.in/poly2016 या संकेतस्थळावर राबविली जाणार आहे.

प्रवेशाचे वेळापत्रक

  • प्रवेश अर्ज भरण्याची मुदत – १८ ते २९ जून
  • कागदपत्रांची छाननी व स्वीकृती- १८ ते ३० जून
  • प्राथमिक गुणवत्ता यादी – २ जुल
  • अंतिम गुणवत्ता यादी – ५ जुल
  • महाविद्यालयांचे पर्याय भरण्याची मुदत – ५ ते ८ जुल
  • प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी – १० जुलै (सायं. ५ वा.)
  • पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया – ११ ते १५ जुल
  • प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी  – १७ जुल
  • दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया – १८ ते २१ जुल
  • प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी  – २३ जुल
  • तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया – २४ ते २७ जुल
  • चौथ्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पर्याय सादर करण्याची मुदत- ३० जुल ते ३ ऑगस्ट
  • चौथ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी – ५ ऑगस्ट
  • अंतिम फेरीचे प्रवेश – ६ ते १० जुल