07 June 2020

News Flash

‘राजा शिवाजी’ला आज पालक-विद्यार्थ्यांचा घेराव

इंडियन एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित दादरच्या राजा शिवाजी विद्यासंकुलातील व्ही. एन. सुळे गुरुजी माध्यमिक शाळेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आज

| June 28, 2014 03:32 am

इंडियन एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित दादरच्या राजा शिवाजी विद्यासंकुलातील व्ही. एन. सुळे गुरुजी माध्यमिक शाळेच्या बदललेल्या वेळापत्रकामुळे संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आज, शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून शाळेच्या संपूर्ण आवाराला घेराव घालून निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिला आहे. शाळेच्या विश्वस्त आणि नव्या व्यवस्थापनाची शनिवारी येथे बैठक होत असून, गतवर्षांप्रमाणे एकाच सत्रात शाळा चालविण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचे पालकांचा मानस आहे.
तब्बल १५ हजार पटसंख्या असलेल्या दादरच्या राजा शिवाजी विद्यासंकुलात इंग्रजी व मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा नवीन शैक्षणिक वर्षांपासून प्रथमच (सकाळ व दुपार) दोन सत्रात सुरू केल्या गेल्या आहेत. तथापि सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत शाळा सुटण्याची वेळ असलेले हे नवीन वेळापत्रक विद्यार्थी-पालक, स्कूल बसचालक तसेच खासगी प्रवास करणारे सर्वासाठी गैरसोयीचे ठरत आहे. विद्यार्थी-पालकांची जाणीवपूर्वक छळणूक व त्रास देण्याचा हा प्रकार असून, त्याबाबत मोठय़ा संख्येने व्यवस्थापनाकडे केलेल्या तक्रारींकडेही आजवर दुर्लक्ष केले गेले
आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2014 3:32 am

Web Title: raja shivaji students parents indian education society
टॅग Parents
Next Stories
1 वैद्यकीयच्या ५५० जागा वाढणार?
2 ‘टीवायबीकॉम’चा निकाल जाहीर
3 अकरावीसाठी दोन लाख अर्ज
Just Now!
X