सुमारे ११ हजार विद्यार्थ्यांचे पात्रता अर्ज वेळेत न भरण्याचा हलगर्जीपणा करणाऱ्या २९३ महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापीठाकडे केली आहे.
महाविद्यालयांच्या या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थ्यांना आपल्या पाचव्या सत्राचा निकाल मिळू शकलेला नाही. शिवाय हे अर्ज भरल्याशिवाय त्यांना सहाव्या सत्राच्या परीक्षेला बसू देण्यास मज्जाव करण्यात आल्याने हे विद्यार्थी दुहेरी संकटात सापडले आहेत. विद्यार्थ्यांना या पद्धतीने मनस्ताप देणाऱ्या महाविद्यालयांवर म्हणूनच दंडात्मक कारवाई करण्यात यावी. या कारवाईनंतरही ही महाविद्यालये दाद देत नसतील तर त्यांची संलग्नता रद्द करावी, अशी मागणी मनविसेने केली आहे.