News Flash

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आता ‘तामिळनाडू पॅटर्न’!

शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यात आता ‘तामिळनाडू पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे.

| April 13, 2015 03:27 am

शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्यात आता ‘तामिळनाडू पॅटर्न’ राबवण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयाचे स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी दोन किंवा तीन विषयांचे मिळून एका सत्रासाठी एक पुस्तक अशी रचना करण्यात यावी अशी शिफारस याबाबत नेमण्यात आलेल्या सामितीने केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे हा विषय गेले अनेक महिने चर्चेत आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कसे कमी करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण विभागाने समिती नेमली होती. या समितीने अंतरिम अहवाल सादर केला आहे. त्यानुसार राज्यात तामिळनाडूप्रमाणे सुधारणा करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अनेक शाळा नियोजित पुस्तकांव्यतिरिक्त व्यवसाय, सराव पुस्तके विद्यार्थ्यांना घेणे बंधनकारक करतात. ही पुस्तके शाळेत आणण्याचे विद्यार्थ्यांना बंधन करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे कार्यानुभवसारख्या विषयांचे साहित्य हे शक्यतो शाळांमध्येच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा, अशा शिफारशीही या समितीने केल्या आहेत. याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

समितीच्या अहवालातील शिफारसी..
*प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमाची दोन सत्रांमध्ये विभागणी व्हावी. विषयानुसार स्वतंत्र पुस्तक ठेवण्याऐवजी दोन किंवा तीन विषयांचे मिळून सत्रानुसार पुस्तक ठेवावे
*विद्यार्थ्यांला एक किंवा दोनच पुस्तके शाळेत न्यावी लागावीत. शाळांनी सात किंवा आठ विषयांचे तास ठेवण्याऐवजी तीन किंवा चार विषयांचे तासच ठेवावेत
*पुस्तकांचे वजन कमी करण्यासाठी कमी जाडीचा आणि हलका कागद वापरण्यात यावा. प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा असावी, जेणेकरून दप्तरातील पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी होईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2015 3:27 am

Web Title: tamilnadu pattern to reduce weight of heavy school bags
टॅग : School Bags
Next Stories
1 परीक्षा परिषदेतील कार्यक्षम अधिकाऱ्याला ‘शिक्षा’
2 राज्यशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच नाहीत
3 शिक्षकांनो एकत्र या..‘व्हॉट्सअ‍ॅप’वर!
Just Now!
X