राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यामिक शाळांची सुटी १ नोव्हेंबरऐवजी किमान तीन दिवस आधी सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
सणाच्या तयारीसाठी शिक्षकांना किमान तीन दिवस आधी सुटी मिळणे आवश्यक आहे. एरवी दिवाळीच्या चार दिवस आधी सुरू होणारी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची सुटी यंदा दिवाळीच्या तोंडावरच सुरू होते आहे.
१ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुटी सुरू होते आहे. १ नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि २ नोव्हेंबरला नरक चतुर्दशी आहे. दिवाळीच्या ऐन तोंडावरच सुटी सुरू होत असल्याने घरच्या साफसफाईपासून ते फराळ, खरेदी अशा सर्वच दिवाळीशी संबंधित कामासाठी शिक्षकांना वेळच मिळणार नाही आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत शाळा सुरू असल्याने शिक्षकांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे, दिवाळीची  तीन दिवस आधीपासून जाहीर करावी, अशी मागणी ‘मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस शिक्षक विभागा*च्या उमा ढेरे यांनी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना पत्र लिहून केली आहे.