उत्तम मागणी असलेल्या फूटवेअर क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राशी निगडित विविध अभ्यासक्रम आणि शैक्षणिक संस्थांची सविस्तर माहिती-
नवं काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या, सर्जनशील कल्पनांना बळ पुरविणारे करिअर निवडण्याची इच्छा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तम मागणी असलेल्या फूटवेअर क्षेत्रात पाऊल रोवणे इष्ट ठरते.

  * फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट : फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिटय़ूट ही संस्था केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योगाच्या अंतर्गत कार्यरत असणारी पादत्राणे निर्मिती आणि डिझाइनचं शिक्षण- प्रशिक्षण देणारी दर्जेदार संस्था मानली जाते. या संस्थेच्या शाखा नॉयडा, रायबरेली, चेन्नई, रोहतक, िछदवाडा, कोलकता आणि जोधपूर येथे आहेत. या संस्थेमार्फत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविण्यात येतात. अत्युत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेल्या पहिल्या दहा महाविद्यालयांमध्ये या संस्थेचा क्रमांक लागतो. नामांकित संस्थांमध्ये प्लेसमेंट मिळवून देण्याबाबत या संस्थेनं पहिल्या दहामध्ये स्थान पटकावलं आहे. या संस्थेला एआरएस सुटॉरिया इटली, एलडीटी नागोल्ड जर्मनी, एससीएएम इटली, पीएफआय जर्मनी, सात्रा इंग्लंड, टीबीयू, झ्लिन झेकोस्लोकोव्हिया यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संस्थांचे सहकार्य प्राप्त झाले. युरोपातील नामवंत संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तज्ज्ञ आणि अध्यापक अभ्यासक्रम शिकवायला येतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह असा या संस्थेचा अभ्यासक्रम आहे. उद्योगाला आवश्यक असलेल्या मनुष्यबळ निर्मितीच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

* पदवी अभ्यासक्रम : १) बॅचलर डिग्री इन फॅशन डिझायिनग (कालावधी ४ वष्रे, अर्हता – कोणत्याही विषयासह बारावी.), २) बॅचलर डिग्री इन फूटवेअर मॅनेजमेंट (कालावधी ४ वष्रे, अर्हता -कोणत्याही विषयासह बारावी.), ३) बॅचलर डिग्री इन लिदर गूडस्, अ‍ॅक्सेसरिज डिझाइन (कालावधी ४ वष्रे, अर्हता- कोणत्याही विषयासह बारावी.) या अभ्यासक्रमांची वार्षकि फी प्रत्येकी ६५ हजार रुपये.

* रिटेल मॅनेजमेंट : या संस्थेच्या स्कूल ऑफ रिटेल मॅनेजमेंटने यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅण्ड मास्टर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन रिटेल मॅनेजमेंट हा पाच र्वष कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत नॉयडा कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना, फुरसतगंज कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना, चेन्नई कॅम्पसमध्ये ३० विद्यार्थ्यांना, कोलकता कॅम्पसमध्ये ३० विद्यार्थ्यांना, िछदवाडा कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना, रोहटक कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना, जोधपूर कॅम्पसमध्ये ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. या अभ्यासक्रमाची फी पहिल्या तीन वर्षांसाठी प्रत्येकी ६५ हजार रुपये आणि पुढील दोन वर्षांसाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये.

* पदव्युत्तर पदवी : संस्थेचे पादत्राणे निर्मितीमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- १) मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम इन फूटवेअर डिझाइन अ‍ॅण्ड प्रॉडक्शन मॅनेजमेंट (कालावधी- दोन वर्षे/ अर्हता- संबंधित विषयातील पदवी) २) मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम इन क्रिएटिव्ह डिझाइन अ‍ॅण्ड (कालावधी- दोन वर्षे/ अर्हता- संबंधित विषयातील पदवी)

* परीक्षा पद्धती : या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय प्रवेशपरीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही परीक्षा ‘ऑल इंडिया सिलेक्शन टेस्ट २०१३’ या नावाने ओळखली जाते. प्रवेशपरीक्षेचा पॅटर्न पुढीलप्रमाणे राहील. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची राहील. एकूण १५० गुणांचे प्रश्न राहतील. यामध्ये ४५ गुण गणित, ४५ गुण इंग्रजी, ३० गुण जनरल सायन्स आणि ३० गुण जनरल अवेअरनेस यावर राहतील. कालावधी १५० मिनिटे. निगेटिव्ह माìकग नाही. मॉक टेस्ट संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही परीक्षा देशभरातील ३१ शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईचा समावेश आहे.
ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीची राहील. ही परीक्षा १३ ते १६ जून २०१३ या कालावधीत घेतली जाईल. या परीक्षेचा निकाल जुलच्या पहिल्या आठवडय़ात घोषित होईल. कौन्सेिलग १० ते १२ जुल २०१३ या कालावधीत होईल आणि अभ्यासक्रमांचा प्रारंभ १ ऑगस्टपासून होईल.

* संपर्क : फूटवेअर डिझाइन अँड डेव्हलपमेन्ट इन्स्टिटय़ूट, नॉयडा, ए-१०, नॉयडा डिस्ट्रिक्ट, सेक्टर २४, पिन – २०१३०१. दूरध्वनी- ०१२०- ४५००१५२, ईमेल-admission@fddindia.com वेबसाइट- www.
fddiindia.com  अर्ज व माहितीपत्रकासाठी ५०० रुपये किमतीचा डीडी वरील पत्त्यावर पाठवा.

  सेन्ट्रल फूटवेअर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, चेन्नई : चेन्नईच्या सेंट्रल फूटवेअर ट्रेिनग इन्स्टिटय़ूटची स्थापना केंद्र सरकारच्या लघुउद्योग मंत्रालयानं १९५७ साली केली. पादत्राणं डिझायिनगचं प्रशिक्षण देणारी ही नावाजलेली संस्था आहे. या संस्थेत अत्याधुनिक कॉम्प्युटर एडेड डिझाइनच्या तंत्राद्वारे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतर्फे चार अभ्यासक्रम चालवले जातात.
 
डिप्लोमा इन फुटवेअर प्रॉडक्शन अँड डिझाइन : हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून कोणत्याही शाखेतील बारावी झालेल्या विद्यार्थ्यांस या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. वयोमर्यादा २५ वर्षे. या अभ्यासक्रमाची फी ५० हजार रुपये. ही फी दोन हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात येते.
प्रवेशक्षमता- ८० विद्यार्थी.

  सर्टिफिकेट कोर्स इन फूटवेअर टेक्नॉलॉजी : या अभ्यासक्रमाला दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. वयोमर्यादा- ३५ वर्षे. कालावधी- एक वर्ष. या अभ्यासक्रमांना मेरिटनुसार संधी दिली जाते. या संस्थेने होस्टेलची व्यवस्था केली आहे. या अभ्यासक्रमाची फी १८ हजार रुपये. ही फी दोन हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात येते. प्रवेशक्षमता- १२० विद्यार्थी. दोन्ही अभ्यासक्रमांच्या २२.५ टक्के जागा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. या संवर्गातील उमेदवारांना शैक्षणिक शुल्कामधून सवलत देण्यात येते. १० टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतात. पत्ता : डायरेक्टर, सीएफटीआय, ६५/१, जीएसटी रोड, िगडी [GUINDY] चेन्नई ६०००३२, तामिळनाडू. दूरध्वनी : ०४४२२५०१५२९, फॅक्स- २२५००८७६, वेबसाइट : http://www.cftichennai.com ई-मेल- cfti@vsnl.net

  सेंट्रल फूटवेअर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, आग्रा : आग्रा येथील सेंट्रल फूटवेअर ट्रेिनग इन्स्टिटय़ूट या संस्थेने पादत्राणे निर्मितीच्या अनुषंगाने पुढील दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत-

* सर्टििफकेट कोर्स इन क्रिएटिव्ह डिझाइन अ‍ॅण्ड शू मेकिंग : या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. अर्हताको णत्याही विषयांसह बारावी. या अभ्यासक्रमाला बारावीतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो.

* सर्टििफकेट कोर्स इन कॉम्प्युटर एडेड शू डिझाइन : या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. अर्हता- दहावी. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी वयोमर्यादा- २० जानेवरी २००९ रोजी १७ ते २५ वष्रे.

* क्रॅश कोर्स इन फूटवेअर डिझाईन अँड मॅन्युफॅक्चिरग : या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने. अर्हताको णत्याही विषयासह दहावी. या अभ्यासक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. पत्ता : एसआयटीई- सी, सी-४१ अँड ४२, इंडस्ट्रियल एरिया, सिकंदरा आग्रा. वेबसाइट-अर्ज http://www.cftiagra.org.in