यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २३ फेब्रुवारी रोजी होणारा दीक्षान्त सोहळा अचानक स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयाविषयी विद्यापीठाच्या वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे. दीक्षान्त सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अनिल काकोडकर तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. कृष्णकुमार उपस्थित राहणार होते. या संदर्भात कुलसचिव प्रकाश अतकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कुलगुरूंची प्रकृती ठीक नसल्याने सोहळा स्थगित केल्याचे नमूद केले. कुलगुरू नियुक्त्यांबाबत विद्यापीठांना सर्वोच्च न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. त्यात मुक्त विद्यापीठाचा समावेश आहे किंवा नाही याबद्दल अतकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अशी कोणतीही नोटीस विद्यापीठास मिळाली नसल्याचे स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा स्थगित
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २३ फेब्रुवारी रोजी होणारा दीक्षान्त सोहळा अचानक स्थगित करण्यात आला आहे. या निर्णयाविषयी विद्यापीठाच्या वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
First published on: 21-02-2013 at 06:51 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Convocation function of open university is adjourned