आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या शनिवारपासून मुख्याध्यापक महासंघातर्फे कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, चित्रकला इत्यादी विषय न शिकविण्याचे आंदोलन पुकारण्यात आले होते. मात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात नुकत्याच पुण्यात शिक्षण संचालकांबरोबर झालेल्या बठकीनंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळने स्पष्ट केले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार संच मान्यता (शिक्षक विद्यार्थी प्रमाण), शिक्षक पदे मंजूरीतील त्रुटीमुळे पूर्वीप्रमाणेच इयत्ता नववी तसेच दहावीसाठी पूर्वीचेच तुकडी निकषाप्रमाणे शिक्षक पदे मंजूर करा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकरिता चिपळूणकर समितीचे निकष मान्य करा, शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर सेवकांना अतिरिक्त करून त्यांची सेवा समाप्त करू नये यासारख्या अनेक मागण्यांसाठी मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. या समन्वय समितीत महाराष्ट्रातील सुमारे एकूण १४ संघटनांचा समावेश आहे. शिक्षण संचालकाच्या कार्यालयात झालेल्या या बठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने १५ दिवसांसाठी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. यानंतरची भूमिका समन्वय समितीच्या बठकीनंतर ठरविण्यात येणार आह़े शिक्षण संचालकांबरोबच्या बठकीत सुभाष माने, बाळासाहेब जाधव, विजय गायकवाड, प्रशांत रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते. तर आठवीपयर्ंतचे वर्ग असणाऱ्या शाळांना आठवीमध्ये ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास  एक जादा शिक्षक देणे, अशा अनेक मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज यांनी सांगितले.