मुंबई विद्यापीठातील दूर व मुक्त शिक्षण संस्थेने (आयडॉल) सन २०१४-१५साठीच्या प्रवेशांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया http://www.mu.ac.in/idol  किंवा http://www.mahaonline.gov.in  या संकेतस्थळांवरून होणार आहे. प्रवेश २५ जून ते ३१ जुलै या कालावधीत होणार आहे. यानंतर १६ ऑगस्टपर्यंत १५० रुपये विलंब शुल्कासह प्रवेश घेता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आयडॉल’मधील अभ्यासक्रम
* बीए – इतिहास, राजकीय विज्ञान, सोशिओलॉजी, अर्थशास्त्र, शिक्षण, मानसशास्त्र, वाणिज्य, ग्रामीण विकास, इंग्रजी, हिंदी आणि मराठी या विषयांमध्ये उपलब्ध.
* बीकॉम – अकाऊंट आणि मॅनेजमेंट
* बीएस्सी – माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, नॉटिकल तंत्रज्ञान या विषयांमध्ये
* एमए – इतिहास, राजकारण, सोशिओलॉजी, अर्थशास्त्र, इंग्रजी, हिंदी, शिक्षण, मराठी आणि गुजराती या विषयांमध्ये उपलब्ध.
* एमकॉम – अकाऊंट आणि मॅनेजमेंट
* एम/एमएसस्सी – गणित
* एमएसस्सी – माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञान या विषयांमध्ये.
* एमसीए – या अभ्यासक्रमासाठी २२ जून रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यातील गुणांनुसार प्रवेश दिले जातील.
* पीजीडीएफएम – वित्त व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका.
* पीजडीओआरएम – ऑपरेशन्स रिसर्च फॉर मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर पदविका.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Idol admission process started from june 25 in mumbai university
First published on: 04-06-2014 at 01:02 IST