मराठी विज्ञान परिषदेने पहिली ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत खास विज्ञानविषयक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १२ एप्रिल ते १० मे या काळात हे विज्ञाननिष्ठ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ व १३ एप्रिल या कालावधीत बालोद्यानचा कार्यक्रम आयोजित केला आहे.सहावी,सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी १६ ते १९ एप्रिल या कालावधीत वैज्ञानिक प्रयोगांच्या क्रॅश कोर्सचे आयोजन केले आहे.गणित मित्र हा कार्यक्रम ७ ते १० मे या कालावधीत होणार आहे. अधिक माहितीसाठी  मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी या पत्त्यावर किंवा २४०५४७१४, २४०५७२६८  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Marathi science conference organizes several programs for students
First published on: 05-04-2014 at 06:16 IST