पाठय़पुस्तकांत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी,अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करून शैक्षणिक सहसंचालकाचे पद निर्माण करण्याचा विचार मंडळाकडून केला जात आहे.
यावर्षीच्या दहावीच्या भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र या विषयाच्या पुस्तकांमध्ये चुका झाल्या आहेत. अशा चुका होऊ नयेत यासाठी आणि अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करण्याचा मंडळाकडून विचार केला जात आहे. या शैक्षणिक कक्षामध्ये विविध विषयाचे तज्ज्ञ, संशोधक, मूल्यमापन संशोधक यांचा समावेश असणार आहे. या कक्षाचा प्रमुख म्हणून सहसंचालक दर्जाच्या पदाची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saperate education cell to avoid errors in text book
First published on: 31-05-2013 at 04:16 IST