युवतींना स्वसंरक्षणासाठी छोटा चाकू आणि मिरची पूड वाटण्याचा कार्यक्रम शिवसेनेतर्फे करण्यात येणार आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर हे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पक्षातर्फे सकाळी ९ ते १२ या कालावधीत अबेदा इनामदार महाविद्यालय, पूना कॉलेज, वाडिया महाविद्यालय आणि सेंट मिराज महाविद्यालय येथे या गोष्टी मोफत वाटण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी युवतींना ‘स्वसंरक्षणासाठी चाकू व मिरची पूड बाळगण्याचे’ आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून हे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार गिरीश बापट, चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, राम कदम, नगरसेवक प्रशांत बधे, रमेश बोडके, सदानंद शेट्टी, सुजाता शेट्टी उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena to give knives to women on bal thackerays birth
First published on: 19-01-2013 at 12:01 IST