राज्यात प्रथमच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेतली जात आहे. या परीक्षेची तयारी कशी करायची, प्रत्येक विषयाचा नेमका अभ्यास कसा करायचा याचा आढावा आतापर्यंत घेतला आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विषयाची उजळणी व्हावी यासाठी प्रत्येक विषयातील काही सराव प्रश्न..
* ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ समजावून सांगताना तुम्ही खालीलपैकी काय कराल?
१) प्रात्यक्षिक करून दाखवू, २) तिचा वाक्यात उपयोग करून दाखवू, ३) तिच्या व्युत्पत्तीचा इतिहास सांगू,  ४) तिचा फक्त अर्थ सांगू.
* गणित शिक्षकाच्या अंगी विशेषकरून ….  हा गुण हवाच.
१) तज्ज्ञता, २) संघटनचातुर्य,  ३) गणितीय दृष्टिकोन, ४) प्रामाणिकपणा
* आधुनिक काळात बालकावर सुसंस्कार करण्याची जबाबदारी कोणावर आली आहे?
१) शैक्षणिक संस्थांवर,  २) सामाजिक संस्थांवर, ३) कुटुंबावर,  ४) समाजावर
* शाळा ही समाजाची…. प्रतिकृती असावयास हवी, असे समाजशास्त्रज्ञांचे आग्रही प्रतिपादन आहे.
१) यथातथ्य, २) यथायोग्य, ३) वास्तव्य, ४) आदर्श
* भारतातील अनेक राज्यांत चौदा वर्षे वयाखालील मुलांसाठी राबविली जाणारी सक्तीची शिक्षण योजना म्हणजे घटनेतील …. अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण होय.
१) मूलभूत हक्कांच्या, २) मूलभूत कर्तव्याच्या, ३) मार्गदर्शक तत्त्वांच्या, ४) सरनाम्याच्या.
* ….. यांनी ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हा ग्रंथ लिहून मराठी भाषेच्या व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले. त्यामुळे त्यांना यथार्थतेने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ म्हणून ओळखले जाते.
१) बाळशास्त्री जांभेकर, २) दादोबा पांडुरंग, ३) विष्णुशास्त्री चिपळूणकर, ४) गोपाळ  हरि देशमुख
* ‘कमवा व शिका’ या संकल्पनेचे जनकत्व…. यांच्याकडे जाते.
१) महात्मा फुले, २) कर्मवीर भाऊराव पाटील, ३) महर्षी वि. रा. शिंदे, ४) विष्णुशास्त्री चिपळूणकर
* रामा गणित शिकतो, यात सध्याच्या शिक्षण पद्धतीस अनुसरून कशास अधिक महत्त्व द्याल?
१) गणित, २) अध्ययन, ३) शिक्षक, ४) रामा
* तालुकास्तरावरील शिक्षण प्रशासन व्यवस्थेतील प्रमुख अधिकारी कोण असतो?
१) गटसंशोधन अधिकारी,  २) गटशिक्षण अधिकारी, ३) गटनियोजन अधिकारी, ४) गटविकास अधिकारी
* ….यांनी सन १८४८मध्ये मुंबई येथे स्वत:च्या घरात मुलींची शाळा सुरू केली.
१) जगन्नाथ शंकरशेठ, २) महात्मा फुले, ३) महर्षी वि. रा. शिंदे, ४) गो. ग. आगरकर
* १८३६ मध्ये पुणे जिल्हय़ात …. येथे प्रौढ शिक्षणाचा पहिला प्रयोग केला गेला.
१) पुरंदर, २) जुन्नर, ३) आंबेगाव, ४) उरुळी कांचन
* स्त्रियांसाठी शाळा सुरू करण्याची प्रेरणा जोतिबा फुले यांना मिळण्यात अहमदनगर येथील मिशनऱ्यांचा व …. या महिलेच्या मार्गदर्शनाचा वाटा मोलाचा आहे.
१)  मिसेस थॅचर, २) ताराबाई शिंदे, ३) पंडिता रमाबाई, ४) सरोजिनी रेगे
* मराठी भाषेतील पहिली पाठय़पुस्तके रचण्याचे श्रेय …. यांना द्यावे लागेल.
१) विष्णुशास्त्री चिपळूणकर, २) जगन्नाथ शंकरशेठ,  ३) दादोबा पांडुरंग, ४) बाळशास्त्री जांभेकर
* चांगला शिक्षक होण्यासाठी व्यक्ती….
१) भावनाप्रधान असावी, २) स्पष्टवक्ती असावी, ३) या व्यवसायात कोणकोणत्या संधी आहेत हे जाणणारी असावी, ४) इतर व्यक्तींशी आंतरक्रिया करण्यात आनंद मानणारी असावी.
* महाराष्ट्रातील पहिले नवोदय विद्यालय …. येथे आहे.
१) गडचिरोली, २) चंद्रपूर, ३) नागपूर, ४) अमरावती
* प्राचीन वैदिक काळी …. अध्ययन पद्धती प्रचलित होती.
१) मौखिक, २) लेखन, ३) प्रात्यक्षिक, ४) आत्मिक
* स्वातंत्र्यपूर्वकाळात सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह खालीलपैकी कोणी धरला होता?
१) ना. गो. कृ. गोखले, २) बेहरामजी मलबारी, ३) न्या. म. गो. रानडे, ४) लोकमान्य टिळक
* शिक्षण व तत्त्वज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?
१) जॉन डय़ुई, २) थॉर्न डाईफ, ३) अ‍ॅरिस्टॉटल, ४) जॉन अ‍ॅडम्स
* शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे, असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे?
१) रुसो, २) प्लेटो, ३) जॉन डय़ुई, ४) फ्रोबेल
*  …. हा प्रश्नोत्तर पद्धतीचा जनक मानला जातो.
१) प्लेटो, २) सॉक्रेटिस, ३) जॉन डय़ुई,  ४) रुसो
* शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश …. या थोर समाजसेवकाने आपल्या ‘तृतीय रत्न’ या नाटकातून दिला आहे.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २) महर्षी कर्वे, २) लोकहितवादी, ४) महात्मा जोतिबा फुले
* भारतीय घटनेतील …. ही कलमे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांशी संबंधित आहेत.
१) २५ व २६, २) ३१ व ३२, ३) २९ व ३०, ४) ४१ व ४२
* माध्यमिक शिक्षण आयोग हे ….चे दुसरे नाव आहे.
१) राधाकृष्णन आयोग, २) हंसेबान मेहता समिती, ३) मुदलियार आयोग, ४) ताराचंद समिती
* विशिष्ट हेतूच्या प्राप्तीसाठी परिस्थितीत जुळवून घेऊन आपण आपल्या वर्तनात बदल घडवून आणतो त्या प्रक्रियेस …. असे म्हणतात.
१) अध्ययन प्रक्रिया, २) अध्यापन प्रक्रिया, ३) निरीक्षण प्रक्रिया, ४) परिवर्तन  प्रक्रिया
* विद्यार्थ्यांना द्यावयाचे शैक्षणिक अनुभव म्हणजे … होत.
१ ) लेखी परीक्षा, २) पाठ विवेचन, ३) अध्ययन अनुभव, ४) मूल्यमापन
* पुढीलपैकी कोणता वाचनाचा प्रकार नाही?
१) प्रगटवाचन, २) आत्मवाचन, ३) मनोगत वाचन,  ४) गतिवाचन
* ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
१) पु. ल. देशपांडे, २) श्री. ना. पेंडसे, ३) न. चिं. केळकर, ४) ना. सी. फडके
* वेबसाईट बनविण्यासाठी …. ही भाषा वापरावी.
१) LLTML, २) PTML, ३) CTML, ४) HTML
* पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
१) शाळा हे एक संस्काराचे केंद्र आहे, २) लोकशाही प्रशासनाची पायाभरणी निष्पक्षपाती तत्त्वावर उभारलेली आहे, ३) शाळा ही समाजाची लघुप्रतिमा नाही, ४) व्यवस्थापन हा व्यवसायाचा आत्मा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Teacher eligibility test objective questions for practice
First published on: 12-12-2013 at 01:20 IST