21 October 2019

News Flash

कोल्हापुरात मर्दानी खेळ खेळण्यासाठी चाललेल्या मुलांच्या गाडीला अपघात, 15 जखमी

चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापुरात गाडी उलटून झालेल्या अपघातात 15 मुलं जखमी झाले आहेत. पन्हाळा रोडवर हा अपघात झाला आहे. सर्व मुलं मर्दानी खेळ खेळण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. मुलं 11 ते 14 वयोगटातील आहेत. 15 जण जखमी झाले असून यामधील एकजण गंभीर जखमी आहे. जखमींना छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका क्रूझरमधून सर्व मुलं प्रवास करत होती. पन्हाळ्याला मर्दानी खेळ खेळण्यासाठी हे सर्वजण जात होते. गाडी केरली परिसरात पोहोचली असता चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याशेजारी शेतात जाऊन पलटी झाली. अपघातात 15 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.

First Published on January 5, 2019 11:14 am

Web Title: accident in kolhapur 15 injured