दयानंद लिपारे, कोल्हापूर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे हे दीड दिवसाच्या कोल्हापूर दौरम्य़ावर येऊ नही मनसैनिक उपराच राहिला. ठाकरे यांचा दौरा खाजगी स्वरूपाचा असला तरी त्यांनी किमान काही वेळ काढून कार्यकर्त्यांंशी संवाद साधायला हवा होता, ही माफक अपेक्षाही पूर्ण झाली नाही. निवडणूक तोंडावर असतानाही पक्षाचे कसे चालले आहे, निवडणुकीसाठी वातावरण कसे आहे, मनसेला स्थान कितपत आहे याचा आढावा  घेतला जाईल या अपेक्षेने पदाधिकारी आणि कार्यकर्तेही सज्ज होते. मात्र, सहा वर्षांनंतर जिल्ह्य़ात पाऊ ल टाकल्यानंतर  पुष्पगुच्छ  स्वीकारण्यापल्याड एकाही शब्दाने चर्चा न झाल्याने मनसैनिक नाराज झाला आहे.

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीवेळी कोल्हापूर दौरा केला होता. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मनसेला भक्कम स्थान मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प होता. मात्र पुढे तो हवेत विरला. सन २०१३ मध्ये त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार केला होता.

या पाठबळाच्या आधारे कार्यकर्ते आपल्या परीने पक्षकार्य करीत राहिले. आंदोलनाचा आवाजही घुमू लागला. पाठोपाठ नियमाचा भंग केल्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांंवर गुन्हे दाखल झाले. दोन आकडय़ापासून ते तीन आकडय़ापर्यंत एकेकावर गुन्हे दाखल आहेत. तरीही या मनसैनिकांनी राज ठाकरे आणि मनसेच्या प्रेमाखातर, निष्ठेपायी पक्षाचा झेंडा हाती ठेवला आहे.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

अशा या कार्यकर्त्यांना राज ठाकरे हे कोल्हापूर दौरम्य़ावर येणार असल्याचे समजल्यावर आनंदाचे भरते आले. खाजगी दौरा असला तरी काहीतरी वेळ काढून साहेब संवाद साधणार ही आशा बळावली. त्यातून ठाकरे हे रविवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांंशी संवाद साधणार असा निरोपही धाडला गेला. तथापि, मुक्कामाला असलेल्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ  स्वीकारण्यापलीकडे ठाकरे यांनी कसलाच उत्साह दाखवला नाही. ठाकरे यांच्या या कृतीने कार्यकर्त्यांंमध्ये नाराजी पसरली आहे. ठाकरे यांनी कोल्हापुरात दोन ठिकाणी खाजगी  भेटी  देऊ न   गुजगोष्टी  केल्या.

त्यांनी कोणाशी संवाद साधावा हा त्यांचा वैयक्तिक मामला असला तरी कार्यकर्त्यांंना वाऱ्यावर का सोडले हा प्रश्न त्यांना सतावत आहे. खाजगी दौरम्य़ाच्या निमित्ताने अन्य पक्षांचे नेते येतात तेंव्हा  किमान काही वेळ काढून ते कार्यकर्त्यांंशी चार शब्द बोलतात हा अनुभव सर्वाना आहे. या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांच्या पक्ष, कार्यकर्ते यांच्याबाबत अव्यक्त होण्यावरुन मनसैनिक खाजगीत टीकेचा सूर  लावू लागले आहेत. काहींनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची तयारी चालवली आहे. मते किती मिळतात यापेक्षा लढण्याला ते महत्त्व देत आहेत. त्यांना ठाकरे हे उभारी देतील अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. हा प्रकार पाहता राज ठाकरे यांनी काही कमावण्यापेक्षा अधिक गमावले आहे, असेच चित्र आहे.