28 February 2021

News Flash

कोल्हापूर: पावनगडावर तोफगोळ्यांचा साठा सापडला

तोफगोळे शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज...

पन्हाळा गडाजवळ असलेल्या पावन गडावर तोफगोळ्यांचा मोठा साठा सापडला. गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू असताना तोफ गोळे सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी गुरुवारी दिली. तोफगोळे शिवकालीन असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पन्हाळा गडाच्या शेजारी चार किमी अंतरावर पावनगड आहे. हा गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. तो पन्हाळा गडाचा संरक्षक गड मानला जातो. रेडेघाट परिसरात तो असून वन विभागाच्या ताब्यात आहे. येथे वनविभाग आणि ‘टीम पावनगड’ या संघटनेच्यावतीने विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत महत्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू आहे.

फलक लावण्यासाठी खड्डा खोदला जात असताना महादेव मंदिरा शेजारी तोफगोळ्यांचा साठा सापडला. त्याचे मोजमाप केले असता चारशेवर तोफगोळे असल्याचे आढळून आले.१०० ते २५० ग्राम वजनाचे तोफगोळे आहेत. ते एकावर एक असे रचून ठेवले होते. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी दारूगोळ्याचे कोठार होते. या परिसरात आणखी तोफगोळे सापडण्याची शक्यता आहे. या भागात तोफगोळ्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात साठा सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. तोफगोळ्यांचा इतका मोठा साठा पाहून शिवप्रेमीतून आनंद व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 8:09 pm

Web Title: artillery found at kolhapur pavangad near to panhala fort dmp 82
Next Stories
1 ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत प्रचंड गोंधळ
2 स्तनांच्या कर्करोगावरील औषधाच्या संशोधनास पेटंट
3 वस्त्रोद्योगात नाराजी
Just Now!
X