23 February 2020

News Flash

“भीमा कोरेगाव प्रकरणी ‘एनआयए’ला सहकार्य करा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील”

दरम्यान, या प्रकरणी आमची कुणाचीही चौकशी केली तरी आम्ही त्याला घाबरत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील (संग्रहित छायाचित्र)

भीमा कोरेगावप्रकरणी केंद्र शासनाच्या चौकशी समितीला अर्थात ‘एनआयए’ला राज्य सरकारने सहकार्य केले पाहिजे, अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला दिला. दरम्यान, या प्रकरणी आमची कुणाचीही चौकशी केली तरी आम्ही त्याला घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला तुम्हाला कुणी अडवलंय, आम्ही स्वच्छ आहोत. तसेच तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा, असे थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिले.

या सरकारमध्ये एकमेकांचं एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे तेच पडतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. महाआघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हेच स्वतः मुख्यमंत्री असल्यासारखं वागतात. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.

First Published on January 28, 2020 2:49 pm

Web Title: bhima koregaon case cooperate with nia otherwise the consequences will suffer says chandrakant patil aau 85
Next Stories
1 कोल्हापुरात चार ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध
2 कोल्हापूर जिल्ह्याला ३९१ कोटी रुपयांची कर्जमाफी – सतेज पाटील
3 भाजपचा कोल्हापुरात २८ रोजी मोर्चा – घाटगे
Just Now!
X