महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम हाती घेत मंगळवारी ९२ डिजिटल फलक हटवले.
शहरामध्ये विनापरवाना जाहिरात, शुभेच्छा फलक उभे करण्यात आलेली आहेत. जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होíडंग्ज, बॅनर्स हटवण्याची कारवाई महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
याअंतर्गत राजारामपुरी विभागीय कार्यालयांतर्गत शाहूपुरी, राजारामपुरी, टाकाळा, राजेंद्रनगर, दौलतनगर, शिवाजी विद्यापीठ परिसर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर या परिसरातील विनापरवाना ९२ डिजिटल बोर्ड हटविण्यात आले. सदरची कारवाई उपशहर अभियंता एस. के. माने यांच्या मार्गदर्शनाखाली व कनिष्ठ अभियंता आर. के. जाधव, एन. एस. पाटील, महानंदा सूर्यवंशी, एन. एस. पोवार, मििलद जाधव व पोलीस कर्मचारी यांनी कारवाई केली.
विनापरवाना डिजिटल बोर्ड लावल्यास विभागीय कार्यालयामार्फत संबंधितावार फौजदारी कारवाई करण्यात येईल. तरी विनापरवाना लावण्यात आलेल्या जाहिरात फलक, शुभेच्छा बोर्ड, फ्लेक्स त्वरित संबंधितांनी काढून घ्यावेत असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.