19 January 2021

News Flash

“उद्या उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘उठा’ व्हायला लागला तर…”

चंद्रकांत पाटील यांचं जयंत पाटील यांना उत्तर

फोटो सौजन्य - पीटीआय

गेले दोन-तीन दिवस चंद्रकांत पाटील विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगताना दिसतो आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी टीका केली होती. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांना ‘टरबुज्या’ किंवा मला ‘चंपा’ म्हटलेलं कसं चालतं? असा सवाल त्यांनी केला होता. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांनी त्यांच्या तशा टोपणनावाबाबत वाईट वाटून घेऊ, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना या मुद्द्यावर सडेतोड प्रत्युत्तर दिले.

शरद पवारांची सचिन तेंडुलकरशी तुलना करणाऱ्या ट्विटला निलेश राणेंचं उत्तर, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीने कधीही टरबुज्या म्हटलेले नाही. इतर कोणी म्हटलेलंदेखील मी ऐकलेलं नाही. पण चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा राग मानून घेऊ नये”, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला होते. त्यावर आज कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “चंद्रकांत पाटील या नावाचा शॉर्टफॉर्म ‘चंपा’ असा होतो म्हणून ‘चंपा’ असं संबोधणे अयोग्य आहे. उद्या जयंत पाटील यांचा ‘जपा’, शरद पवार यांचा ‘शपा’ किंवा उद्धव ठाकरे यांचा ‘उठा’ असा उल्लेख व्हायला लागला, तर हे सुसंस्कृत राजकारणात बसणारे ठरणार नाही. त्यामुळे असे प्रकार टाळले पाहिजेत” असं उत्तर त्यांनी दिलं.

“आश्रम’मधील जपनाम वाला भोपा आणि (भा)जपनाम वाला गोपा सारखेच”

कोल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारबद्दलही भाष्य केले. “राज्यातील सरकार भाजपा पडणार नाही. मात्र अंतर्गत कलहातूनच ते सरकार पडेल असे चित्र आहे. आणि जेव्हा असं दिसत असेल, तेव्हा आम्ही नक्कीच भजन करत शांत बसणार नाही. मध्य प्रदेशसह काही राज्यात अंतर्गत वादातून सत्तेतील पक्षात दुभंग झाल्यानंतरच भाजपाने तेथे सत्ता स्थापन केली होती हे साऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“ठाण्यातील शिवसेनेच्या सगळ्याच आमदार, खासदारांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले”

याशिवाय, “परप्रांतियांना राज्यातून हुसकावून लावण्याची भूमिका जर राज ठाकरे यांनी बदलली, तर त्यांचासारखा नेताच नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर परप्रांतियांना विरोध करण्याची भूमिका बदलली, तर भाजपा नक्कीच मनसेला सोबत घेईल”, असं सूचक वक्तव्यदेखील भाजपा प्रदेशाध्यक्षांनी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 7:15 pm

Web Title: chandrakant patil slam shiv sena uddhav thackarey led goverment gives befitting reply to ncp leader jayant patil with good sence of humour vjb 91
Next Stories
1 …तर मनसेलाही सोबत घेऊ- चंद्रकांत पाटील
2 चित्रपट महामंडळात अंतर्गत वाद उफाळला; गुरुवारची सभा वादळी होण्याची चिन्हे
3 हुतात्मा संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
Just Now!
X