कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा घोर बनून राहिलेला दौलत सहकारी साखर कारखाना अखेर गुरुवारी बेळगावच्या कुमुदा शुगर्सला २९ वर्षांसाठी भाडे (लीज) तत्त्वावर सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एनपीए कमी होण्याबरोबरच नफ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.
आज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कुमुदा शुगर्सला याबाबतचे करारपत्र प्रदान केले. या वेळी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले, की कुमुदा शुगर्सने ३१ जानेवारी रोजी बँक गॅरंटी १५ कोटी आणि रोख १० कोटी दिल्यास त्यांना ताबडतोब परवाना देणार असल्याचे सांगितले. या वेळी प्राधिकृत अधिकारी जयवंत पाटील यासह संचालक मंडळ उपस्थित होते.
मुश्रीफ पुढे म्हणाले, की कुमुदा शुगर्सने वित्तीय संस्था, कामगार देणी शासकीय देणी ही वेळच्यावेळी वेळी द्यावयाची आहेत. बँकेला जी रक्कम द्यायची आहे ती ३१ जानेवारीच्या आत न दिल्यास हा करार रद्द समजण्यात येईल. कारखान्यास बँकेचे पूर्ण सहकार्य राहील असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. कुमुदा शुगर्सचे अध्यक्ष अविनाश भोसले म्हणाले, की दौलत साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर घेतल्याचा खूप आनंद होत आहे. यंदा चाचणी हंगाम घेण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
या वेळी बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संचालक भया माने, विलास गाताडे, जयंत पाटील, माजी आमदार नरसिंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण, दौलत कारखान्याचे माजी चेअरमन गोपाल पाटील आदी उपस्थित होते.

land, industrial development, Kolhapur,
कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
Director of Rosary School
पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हजर