विधान परिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या िरगणात विद्यमान सदस्य महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील या दोघांमध्येच लढत होणार असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. दोन घराण्यांतील टोकाला गेलेले राजकीय वैर पाहता ही लढत वाघ-सिंहाची असल्याचे जिल्ह्यात म्हटले जात आहे. प्रतिष्ठेच्या या लढतीस बाजी मारण्यासाठी दोन्ही उमेदवारांकडून सर्व प्रकारे मतदारांना वश करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने मतदारराजाचा भाव चांगलाच वधारला आहे. घोडेबाजारामुळे रंगणाऱ्या या सामन्यात कोणाची सरशी होते याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे.
उमेदवारी अर्ज घेण्याचा आजच्या अखेरच्या दिवशी भाजपचे उमेदवार विजय सूर्यवंशी, माजी आमदार अशोक जांभळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्वरुप महादेवराव महाडिक यांच्यासह अन्य अपक्षांनी तलवार म्यान केली. यामुळे महाडिक व पाटील या दोघांतच अटीतटीची लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले.
भाजपाचा महाडिकांना पािठबा
निवडणुकीच्या िरगणातून भाजपने नाटय़मयरीत्या माघार घेतानाच काँग्रेस विरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून मदानात उतरलेल्या महादेवराव महाडिक यांना पािठबा दिला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी शनिवारी ही घोषणा शहर कार्यालयात पत्रकार परिषदेत केली.
हाळवणकर म्हणाले की, विजयासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ आमच्या पक्षाकडे नसल्याने माघारीचा निर्णय घेतला आहे. निवडून येण्याची क्षमता असण्याबरोबरच भाजपाशी चांगले संबंध असणारे महाडिक यांना आम्ही पािठबा देण्याचा निर्णय घेतला आहे. महाडिक यांनी भाजपकडे पािठब्याबाबत मागणी केलेली नाही. मात्र काँग्रेसच्या सतेज पाटील यांना पराभूत करण्यासाठीच आमचा पक्ष महाडिक यांना पािठबा देत आहे. भाजपची हक्काची ६५ ते ७० मते असून जिल्ह्यातील काही आघाडय़ांचे नेते संपर्कात आहेत. यामुळे महाडिक यांना निवडणुकीत किमान १०० मतांचा फायदा नक्की होणार असल्याचे हाळवणकर यांनी सांगितले.
मुश्रीफांच्या शिष्टाईस थंडा प्रतिसाद
सतेज पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी शुक्रवारी रात्री झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान केले होते. शनिवारी त्यासाठी मुश्रीफ हे गोकुळ दूध संघात महाडिकांना भेटण्यासाठी गेले पण महाडिकांनी त्यांची भेट टाळल्याने मुश्रीफांना थंड बसावे लागले. त्यांनी खासदार धनंजय महाडिक, महाडिक समर्थक जिल्हा बँकेचे संचालक शंकर पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यासही प्रतिसाद मिळाला नाही. महाडिक निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले. महाडिक व पाटील यांच्यातील वाद मिटावा यासाठीच आपले प्रयत्न सुरू होते, असेही ते म्हणाले.