कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक व काही नागरी सहकारी बॅँकांचे संचालक मंडळ गेल्या दहा वर्षांत गरकारभारामुळे बरखास्त झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँक व नागरी सहकारी बँकांच्या संचालकांना पुढील आठवडय़ात विभागीय सहनिबंधक नोटिसा लागू करणार आहेत.
जिल्हा बॅँकेचे २८ जणांचे संचालक मंडळ बरखास्त झाले होते. आमदार हसन मुश्रीफ हे राज्य बॅँकेच्या बरखास्त संचालक मंडळातही आहेत. २८ पकी तीन मृत वगळता २५ संचालकांना कारवाईबाबत पुढील आठवडय़ात विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे नोटिसा लागू करणार आहेत. त्यामुळे संचालकांचे धाबे दणाणले आहेत. या वटहुकुमामुळे जिल्हा बॅँकेच्या विद्यमान दहा संचालकांना दणका बसणार आहे. बरखास्त संचालक मंडळात असलेले उर्वरित २५ संचालकही अडचणीत आले आहेत. या दिग्गजांची साखर कारखाना, बॅँका, सूतगिरण्यांसह विविध सहकारी संस्थांमधील पदे धोक्यात आली आहेत.
नव्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केल्यानंतर संपूर्ण सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक व काही नागरी सहकारी बॅँकांचे संचालक मंडळ बरखास्त झाले आहे. जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ बरखास्त होऊन त्यांच्यावर नुकसानभरपाईसाठी जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. याबाबतच्या नोटिसांना संचालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. वटहुकुमाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार तयार केली आहे. जिल्हा बॅँकेचे संचालकपद धोक्यात आलेच; पण त्याबरोबर इतर सहकारी संस्थांमधील पदेही धोक्यात येणार आहेत.