महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनचे अध्यक्ष, उद्योगपती पंडित कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला. फाय फाऊंडेशनचे कार्यवाह डॉ. एस. पी. मर्दा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन हा निधी सुपूर्द केला. या वेळी आमदार सुरेश हाळवणकर, उद्योजक नितीन धूत, ललित गांधी उपस्थित होते.
फाय फाऊंडेशनच्या वतीने राज्यासह राष्ट्रीय आपत्तीवेळी नेहमीच मोलाची मदत केली जाते. सन २०१५मध्ये झालेल्या भूकंपावेळीही या फाऊंडेशनने पंतप्रधान सहायता निधीस एक कोटी रुपये दिले होते. तसेच विविध क्षेत्रांत असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना, तसेच खेळाडूंना दरवर्षी लाखो रुपयांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. फाऊंडेशनच्या वतीने गेली ४० वष्रे हे कार्य अखंडितपणे सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून फाय फाऊंडेशनला धन्यवाद देऊन आभार मानले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 23, 2016 3:15 am