पदाचा गरवापर करून फसवणूक केल्याप्रकरणी हातकणंगलेचे तत्कालीन तहसीलदार दीपक िशदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश इचलकरंजी येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एस. डी. चव्हाण यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे सरकारी खात्यात खळबळ उडाली आहे.

िशदे हे हातकणंगले येथे तहसीलदारपदी रुजू झाल्यानंतर इचलकरंजी येथील कर सल्लागार राजेश रेवणकर यांच्या बंगल्यामध्ये भाडय़ाने राहण्यास होते.

त्यानंतर िशदे व रेवणकर यांची सलगी वाढली. त्यातून िशदे यांनी रेवणकर यांच्याकडून राहत्या बंगल्यात व हातकणंगले तहसील कार्यालयात २ वातानुकूलित यंत्रे (एसी) ४ एप्रिल व २५ मे रोजी बसवून घेतले. त्याचे ५५ हजार रुपयांचे बिल रेवणकर यांनी अदा केले.

त्यानंतर पुणे येथे सदनिका खरेदीसाठी िशदे यांना रेवणकर यांनी वेळोवेळी साक्षीदारासमक्ष एकूण २५ लाख रुपये दिले.

ही रक्कम देण्यास िशदे यांच्याकडून टाळाटाळ होत असल्याने रेवणकर यांनी ३९ लाख ३८ हजारांची लेखी नोटीस िशदे यांना पाठविली. त्यानंतरही िशदे यांनी रक्कम परत न केल्याने १६ मार्च रोजी रेवणकर यांनी येथील न्यायालयात िशदे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

या तक्रारीची सुनावणी न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर झाली. त्यामध्ये न्यायालयाने लेखी पुराव्यांची पडताळणी करून आरोप निश्चिती करून तत्कालीन तहसीलदार दीपक िशदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. राजेश रेवणकर यांच्या वतीने अ‍ॅड. एस. एन. मुदगल यांनी काम पाहिले.