News Flash

रशियातील जहाज अपघातात कोल्हापूरचा तरुण बेपत्ता

रशियात तेलवाहू जहाजाला लागलेल्या आगीत होरपळून १४ खलाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रशियातील समुद्रात तेलवाहू जहाजांना लागलेल्या आगीत कोल्हापूर जिल्ह्यातील एक खलाशी सापडला आहे.

कोल्हापूर : रशियातील समुद्रात तेलवाहू जहाजांना लागलेल्या आगीत कोल्हापूर जिल्ह्यातील एक खलाशी सापडला आहे. तो बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना गुरुवारी सायंकाळी काम करीत असलेल्या कंपनीच्या सूत्रांनी दिली. अक्षय बबन जाधव (रा. कोडोली, ता. पन्हाळा) असे या युवकाचे नाव आहे. रशियात तेलवाहू जहाजाला लागलेल्या आगीत होरपळून १४ खलाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या २ जहाजांवर ६ भारतीय काम करत होते. ते सर्व बेपत्ता आहेत. या जहाजांपैकी एका जहाजावर अक्षय सुद्धा कामाला होता. मात्र, तो सुद्धा बेपत्ता आहे.   रशियाजवळील कर्चच्या समुद्रात ही घटना घडली आहे. त्यामध्ये काही भारतीय खलाशी  होते. अक्षय बबन जाधव हा त्यापैकी एक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2019 12:35 am

Web Title: kolhapur youth missing after 2 ships catch fire in kerch strait
Next Stories
1 महाराष्ट्र क्रांती सेनेचे लोकसभेचे उमेदवार जाहीर
2 पानसरे हत्या प्रकरण : अमित डेगवेकर याच्या पोलीस कोठडीत वाढ
3 पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना निवडणुकीत विरोध
Just Now!
X