29 October 2020

News Flash

कोल्हापूर : झेडपी सदस्य राहुल आवाडे यांना दुसऱ्यांदा करोनाची लागण

करोनामुक्त व्यक्तीला पुन्हा लागण होत नाही हा समज ठरला फोल

राहुल आवाडे, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य

जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांना महिन्याभरातच दुसऱ्यांदा करोनाची बाधा झाली आहे. एकाच व्यक्तीला दोनदा करोनाची बाधा होण्याची ही जिल्ह्यातील बहुधा पहिलीच घटना आहे.

इचलकरंजी शहरात करोनाचे थैमान सुरु असून त्याची लागण संपूर्ण आवाडे परिवाराला झाली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह त्यांच्या घरातील सदस्य व कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचाही समावेश होता.

ऑगस्ट महिन्यात राहुल आवाडे यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शहरातील अलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन ते सुखरुप घरी परतले होते. मात्र, बुधवारपासून त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी आपली पुन्हा एकदा तपासणी करुन घेतली असता गुरुवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल. त्यामुळे त्यांना पुन्हा उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळं करोनामुक्त व्यक्तीला पुन्हा लागण होत नाही हा समज फोल ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 7:44 pm

Web Title: kolhapur zilla parishad member rahul awade contracted covid 19 for the second time aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी मोर्चेबांधणी
2 शॉर्टसर्किटमुळे कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात आग
3 राजू शेट्टींनी घरासमोरच पेटवली कृषी विधेयकांची होळी
Just Now!
X