मुलास प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्या इच्छेविरुद्ध विवाह केला. तसेच सून सतत आजारी पडते, तिला मूल होणार नाही. असा समज करून सासू-सासऱ्याने सुनेचा गळा दाबून खून केला. रिया बादल पाटील (वय ३५) असे मृत विवाहितेचे नाव असून या प्रकरणी सासरा सरदार रामचंद्र पाटील, सासू सुनीता पाटील (रा. फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

बादल पाटील याचे व रियाचे प्रेमसंबंध होते. मात्र बादलच्या आई-वडिलांना रिया पसंत नव्हती. सासू-सासऱ्याचा विरोध डावलून रियाने बादलशी प्रेमविवाह केला. लग्नापूर्वी रियाला हृदय विकाराचा आजार असल्याने तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया केली होती. सतत आजारी पडणाऱ्या रियाला मूल होणार नाही. असे सासू सासऱ्यास वाटत होते. त्यामुळे ते तिचा छळ करीत होते.

बुधवारी सायंकाळी पती बादल पाटील कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून सासरा सरदार व सासू सुनीता या दोघांनी झोपेत असणाऱ्या रियाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर बादल यास रिया बेशुद्ध पडली असल्याबद्दल फोन करून सांगितले. बादल घरात आला. त्याने रियाला सीपीआर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे समजले.

करवीर विभागाचे उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तपास केला असता रियाचा घातपात झाल्याचे समजत होते. रियाच्या माहेरचे नातेवाईक चंद्रकांत यशवंत हिंदूळे (वय ३५, रा.क्रांती चौक, कंदलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासू, सासऱ्यावर गुरुवारी रात्री करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.