इचलकरंजी शहरात ३ दिवस टाळेबंदी कडक करण्याचा निर्णय घेण्यात काल घेण्यात आल्यानंतर मंगळवारी बंदला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज सकाळपासून नित्याचे व्यवहार ठप्प झाले होते. सकाळी मुख्य मार्गावर चिटपाखरू सुद्धा दिसत नव्हते. या औद्योगिक शहरातील जनजीवन ठप्प झाल्याने उद्योग कारखाने बंद राहिले. शहरात करोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने नागरिकांतून टाळेबंदीची मागणी होत होती. त्यानुसार ७० रुग्ण असलेल्या या टाळेबंदी अधिक कडक करण्याची मागणी होत होती.

नगरपालिकेच्या काल दुपारी झालेल्या बैठकीत ३ दिवस टाळेबंदी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकाळात अकारण वाहन घेवून फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रशासन व पोलिसांनी घेतलेल्या खडक भूमिकेचा परिणाम आज सकाळपासूनच शहरात सर्वत्र दिसून आला. प्रभात भ्रमंती व्यायाम यानिमित्ताने रस्तावर येणारे रस्त्यावर येणाऱ्या लोकांची संख्या खूपच रोडावली होती त्यामुळे मुख्य मार्गसुद्धा मार्गावर सुद्धा शुकशुकाट दिसत होता.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
nashik police conduct combing operation across the city due to festivals celebrations
नाशिक : सण, उत्सवांमुळे अवैध शस्त्रसाठा शोध मोहीम

शहरातील एकूणच वर्दळ थांबली होती इचलकरंजी हे राज्याचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते या औद्योगिक शहरातील उद्योग व्यापार व्यवसाय सकाळपासूनच बंद होते शहरात रुग्ण संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये टाळेबंदी संचारबंदी ची गरज भासत असल्याचे आज सकाळीच मिळालेल्या प्रतिसादावरून निदर्शनास आले. शहराच्या प्रतिबंधित क्षेत्रासह अन्यत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.