News Flash

कोल्हापुरात ऑनलाइन फसवणूक

व्यावसायिकाला तेवीस लाखांचा गंडा

व्यावसायिकाला तेवीस लाखांचा गंडा

कोल्हापूर : बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत भामटय़ाने बँकेच्या खातेदाराकडून ‘ओटीपी’ क्रमांकाची माहिती घेत बँकेच्या खात्यातून परस्पर २३ लाख ४८ हजार रुपये काढून व्यावसायिकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत शिवगौंडा भीमगौंडा पाटील (रा. उजळाईवाडी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

शिवगौंडा पाटील हे व्यावसायिक आहेत. शनिवारी पाटील हे कसबा बावडा येथून उजळाईवाडी या ठिकाणी घरी जात होते. दरम्यान, घरी जात असताना वाटेतच पाटील यांना एका मोबाइलवरून फोन आला. त्या व्यक्तीने आपण ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’तून बोलत असून, तुमचे खाते बंद झाल्याचे सांगितले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी पाटील यांच्या मोबाइलवर लिंक पाठवून ती ओपन करण्यास सांगितले.

लिंक ओपन केल्यावर संशयिताने पाटील यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. पाटील यांची फसवणूक करून ओटीपी क्रमांक मिळवून त्याधारे भामटय़ाने त्यांच्या खात्यातील ‘ऑनलाइन’ पद्धतीने २३ लाख ४८ हजार रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार  दाखल केली आहे, असे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 12:57 am

Web Title: online fraud in kolhapur zws 70
Next Stories
1 सहलीच्या बसला अपघात; विटय़ातील १४ विद्यार्थी जखमी 
2 कोल्हापुरातील मटण वादावर अखेर तोडगा, नेमका काय होता वाद? घ्या जाणून
3 ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला कोल्हापुरात आज सुरुवात
Just Now!
X