राज्य कामागार विमा योजनेच्या (ईएसआय) रुग्णालयाची दुरवस्था झाल्याने औद्योगिक आणि कामगार संघटनांनी समस्या सातत्याने मांडल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा केला होता पण अडचणी कायम राहिल्या. कंत्राटदार पळून गेले, करोनामुळे विलंब झाला. कामाला गती आली असून आगामी जानेवारी अखेर हे काम पुर्ण होईल, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी शनिवारी येथे केले.

येथे आज ईएसआयचे नविन क्षेत्रीय कार्यालय सुरू झाले. कोल्हापूर, सांगली,सातारा,रत्नागिरी,सिंधूदुर्ग,सातारा इ. जिल्हयाचा कारभार येथून होणार आहे. वैद्यकिय दावे व योजनांचा लाभ लवकर देता येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयाचे खासदार मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी फीत कापून व दिपप्रज्वलन करून उद्घाटन केले. याप्रसंगी ते बोलत होते.खासदार माने यांनी कर्मचा-यांचे दावे पुर्ण करण्यास विलंब करू नका. कोल्हापूरात १५० खाटचे रुग्णालय होईल. त्यानंतर इचलकरंजीतही १०० खाटचे रुग्णालयसाठी खासदार मंडलीकांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

High Court orders Municipal Corporation to remove illegal vendors from Hill Road
मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

ईएसआय सोसायटीचे राज्य संचालक महेश वरूडकर म्हणाले, महाराष्ट्रातून सर्वात जास्त वर्गणी ईएसआय महामंडळाला जात असल्याने राज्याला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी खासदार मंडलिक यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत.कोल्हापूर चेंबरचे संचालक, ईएसआयचे समन्वयक विज्ञानंद मुंढे म्हणाले की, ईएसआयसी सेवांबाबतीत कोल्हापूर देशातील रोल माॅडेल जिल्हा होईल. डॉ. मिलींद चैधरी यांनी प्रास्ताविक तर जॉन डिसूजा यांनी आभार प्रदर्शन केले. विश्वविजय खानविलकर, संजय शेटे, हर्षद दलाल, एम.वाय.पाटील, राजू पाटील, अभिनव पेडणेकर, देवेंद्र दिवाण, कामगार लाभार्थी व उद्योजक उपस्थित होते.