कोल्हापूर: नोकरीतील स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सीपीआर रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास गुरुवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हुसेनदाशा कादरसाब शेख ( ४७, रा. शनिवार पेठ कोल्हापूर, मूळ सोलापूर) असे त्याचे नाव आहे.
आणखी वाचा- कोल्हापूर: महागाई विरोधात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा इचलकरंजीत तिरडी मोर्चा
यातील महिला तक्रारदार या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सीपीआर) येथे अधिपरिचारिका पदावर नोकरीस आहेत. त्यांना स्थापित प्रमाणपत्र शेख याने तयार करून दिले होते. त्याच्या मोबदल्यात शेख याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारत असताना त्यास आज त्याच प्रतिबंधक विभागाचे कारवाई पोलीस निरीक्षक नितीन कुंभार व सहकार्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.