कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्या वतीने गुरुवारी महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. हद्दवाढ झाल्यानंतरच महापालिकेची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून अद्याप एक इंचही हद्दवाढ झाली नाही. गतवर्षी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात महापालिकेची हद्दवाढ करण्याबाबत नव्याने प्रस्ताव सादर करावा असे सांगितले होते. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता.

मात्र त्याची राज्य शासनाच्या पातळीवर अंमलबजावणी होत असताना दिसत नाही. यामुळे हद्दवाढीचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले आहे. यासाठी वीस गावातील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना हद्दवाढीचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या प्रशासकीय डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत कृती समितीने त्यांच्याशी चर्चाही केली होती. त्यानंतर आंदोलनाचे पाऊल म्हणून आज ठिय्या आंदोलन करण्यात आले. माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, दुर्गेश लिग्रस, सत्यजित कदम, बाबा इंदुलकर, किशोर घाटगे यांच्यासह सदस्य महिला, सहभागी झाले होते.

land, BJP MLA, Nagpur,
भाजपा आमदाराला ६०० कोटींची जमीन १ रुपयांत; नागपूर महापालिकेचा अजब कारभार
Akhil Bharatiya Marathi Natya Parishad, Voting Awareness, Pimpri Chinchwad, Maval Lok Sabha Constituency, new voters, voting awareness in new voters, lok sabha 2024, election 2024, Vasudev, Vasudev spreads voting awareness, pimpri news, pimpri chinchwad news,
पिंपरी : नाट्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या वतीने वासुदेव करतोय मतदान जनजागृती
Kidnapping of officer in case of embezzlement in Kolhapur Zilla Parishad
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अपहारप्रकरणी अधिकाऱ्याचे अपहरण, मारहाण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त
BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई