वाढत्या प्रदूषणाची जाण आल्याने गणेशभक्तामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढत असताना दुसरीकडे त्याचा गरफायदा घेत प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या मूर्तीच पर्यावरणपूरक असल्याचेच भासवणारी गल्लाभरू प्रवृत्ती वाढत आहे. याद्वारे मूर्ती विक्री करणाऱ्यांना तिप्पट कमाई होत असली तरी पर्यावरणपूरक मूर्ती घेणाऱ्यांची आíथक फसगत होण्याबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. यामुळे मूर्ती नेमकी प्लॉस्टर ऑफ पॅरीसपासून बनवली आहे की पर्यावरणपूरक घटकांपासून (शाडू, कागदी, लाल माती) हे स्पष्ट करणारी सुविधा उपलब्ध केली जावी अशी मागणी भाविक करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गणेशोत्सवाला जोडूनच गेल्या काही वर्षांत पर्यावरणाची चर्चाही तीव्रपणे होऊ लागली आहे. विशेषत: प्लास्टर ऑफ पॅरीस वापरात आल्यापासून आणि अवाढव्य मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचे प्रस्थ सुरू झाल्यापासून या चच्रेला धुमारे फुटले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या श्री मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या लवकर विरघळत नसल्याने अनंत चतुर्दशीनंतर मूर्तीचे अवशेष भक्तांना क्लेशदायक असतात. हा मुद्दा वारंवारपणे चíचला गेल्यानंतर पर्यावरणप्रेमी नागरिक, संघटना तसेच भाविकांकडून पर्यावरणपूरक श्री मूर्तीची प्रतिष्ठापना केली जावी असा आग्रह सुरू झाला. काही संस्थांनी तर त्यासाठी प्रबोधन मोहीम उघडली असून या प्रकारातील उत्कृष्ट श्री मूर्तीना पारितोषिक देण्याची पद्धतही रूढ झाली आहे. परिणामी पर्यावरणपूरक श्री मूर्ती घेण्याकडे कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

तथापि, या बदलत्या प्रवाहाचाही आíथक लाभ उठवणारे महाभाग निर्माण झाले आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचे फलक लावून प्लास्टर ऑफ पॅरीसच्याच मूर्ती भाविकांच्या गळ्यात मारली जात आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrate the ganesh chaturthi festival in kolhapur
First published on: 05-09-2016 at 01:41 IST