NCP Hasan Mushrif ED Raid : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

raj kundra properties
ईडीकडून शिल्पा शेट्टीच्या पतीची संपत्ती जप्त; कथित ६६०० कोटींची बिटकॉइन फसवणूक काय?
MNS, Mahayuti campaign, Pune, MNS pune,
पुण्यात मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार… पण मनसेच्या नेत्यांनी ठेवली ‘ही’ अट
Wild dogs were found for the first time in Phansad Sanctuary
फणसाड अभयारण्यात पहिल्यांदा आढळला रानकुत्र्यांचा वावर
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार

हेही वाचा : “काँग्रेसकडे एकनाथ शिंदेंपेक्षा ताकदीचे नेते, फक्त…”, नाना पटोलेंचा खोचक टोला

हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दररोज जनता दरबार भरतो. विविध कामांसाठी लोकांची गर्दी त्यांच्या घरी जमते. मात्र, लोक येण्यापूर्वीच ईडीने निवासस्थानाचा ताबा घेतला होता. याची माहिती मिळताच कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच, ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.

आणखी वाचा – Bacchu Kadu Accident : अपघातानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आज सकाळी…”

पुण्यातील मालमत्तांवर छापेमारी

बुधवारी सकाळी ईडीने मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील यांच्या घरावर छापे टाकले. पुण्यातील कोंढवा येथील अशोका मुज सोसायटी आणि गणेशखिंड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. कोंढवा भागात मुश्रीफ यांचे नातेवाईक राहायला आहेत. तसेच, मुश्रीफ यांच्या कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन येथील मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले आहेत.

हेही वाचा : “पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर सावधान…”, काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलांचे नाना पटोलेंचे संकेत

काय आहे प्रकरण?

काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होतं. २०२० साली आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना पारदर्शक पद्धतीने व्यवहार न होता ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र, तरी सुद्धा या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.