गॅस सिलेंडरचा स्फोट ; अंगणवाडी सेविका जखमी

घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसच्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली.

कोल्हापूर: घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसच्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली. घराच्या भितींना तडे जावून छताचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. हा स्फोट बुधवारी सकाळी कबनुर गावात झाला आहे.

कांचन संजय स्वामी, असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. त्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प हातकणंगले प्रकल्प दोन मध्ये अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना उपचारांसाठी त्वरीत शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती गंभीर बनल्याने सांगली येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कबनूर, दत्तनगरमध्ये घरात भाड्याच्या घरात स्वामी राहत आहेत. त्यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन स्फोट झाला. या स्फोटात त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. घराचे छत उडून जावून छताचे अक्षरशः तुकडे झाले आहेत. भितींना तडे गेले आहेत. या घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कोल्हापूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Explosion of gas cylinder kolhapur anganwadi worker injured srk