अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवणार असल्याच्या वावडय़ा सगळीकडे चच्रेला जात आहेत. परंतु घटनेप्रमाणे चित्रपट महामंडळाचे मुख्य कार्यालय कोल्हापुरातच राहणार आहे. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी ते हलवू शकत नाहीत, असे रोखठोक विधान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष आणि क्रियाशील पॅनेलचे प्रमुख अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षकि निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पाटकर बोलत होते. या वेळी क्रियाशील पॅनेलचे उमेदवार निवेदिता सराफ, प्रकाश जाधव, राजेश देशपांडे, विजय राणे आदी उपस्थित होते.
विजय पाटकर म्हणाले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक चांगल्या बाबी करण्याचा प्रयत्न केला. सभासदांचे हित जोपासण्याबरोबरच महामंडळाचा कारभार पारदर्शी करण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या अध्यक्षांनी कार्यक्रमाच्या दरम्यान केलेल्या वाढीव खर्चाचा मुद्दा वारंवार गाजत आहे. त्यावरदेखील आपण वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे. या निवडणुकीत माझ्यावर अनेक टीका आणि आरोप झाले. चांगले काम करणाऱ्यांवरच आरोप होतात. मला काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. चित्रपट महामंडळातील आमचेच सभासद संचालक मंडळाचे पाय ओढतात, ही दुर्दैवाची बाब आहे. अनेकांनी माझ्यावर टीका केली, पण मी कोणावरही टीका करणार नाही, असे ते म्हणाले.

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
cannes film festival, FTII, short film,
प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात पुण्याच्या एफटीआयआयचा लघुपट
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”