कापड व्यापा-याकडून वस्त्रोद्योजकांना गंडा

चेन्नई येथील कापड व्यापाऱ्याने इचलकरंजीतील वस्त्रोद्योजकांना आíथक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस

नवी दिल्ली, मुंबईपाठोपाठ चेन्नई येथील कापड व्यापाऱ्याने इचलकरंजीतील वस्त्रोद्योजकांना आíथक गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इचलकरंजीतील वस्त्रोद्योजक सागर विजय कोईक यांनी कापडाला चांगला भाव मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या चेन्नई येथील  कापड व्यापाऱ्यांविरोधात १६ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद शुक्रवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सागर कोईक यांचा श्री सोना टेक्स्टाईल नावाने कापड विक्रीचा व्यवसाय आहे. चेन्नईतील श्रीकृष्णा टेक्स्टाईल एजन्सी, प्रेमा टेक्स्टाईल्स, कनमानी टेडर्स आणि बालाजी गारमेंटचे मालक यांनी कापडाला जादा भाव मिळवून देतो असे सांगून कोईक यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे कोईक यांनी ३ जून २०१४ ते १९ ऑगस्ट २०१४ या कालावधीत वेळोवेळी १६ लाख ३ हजार रुपयांचे कापड विकले. त्याची रक्कम सातत्याने मागूनही ती मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fraud of textile entrepreneurs from cloth merchant